शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बैलगाड्यांसह शेळ्या-मेढ्यांचा मोर्चा

By admin | Updated: May 31, 2017 23:27 IST

बैलगाड्यांसह शेळ्या-मेढ्यांचा मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : सरसकट सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी, शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळावा, यासह विविध मागण्यांसाठी ‘किसान क्रांती’ संघटनेच्या नेतृत्वाखाली बैलगाड्यांसह शेळ्या-मेढ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर बुधवारी दुपारी मोर्चा काढण्यात आला.या मोर्चामध्ये महिलांचाही सहभाग लक्षणीय होता. मोर्चाच्या पुढे वाजंत्री होते. वाजंत्रीच्या सुरात शेतकऱ्यांचा मोर्चा निघाला होता. पाठीमागे बैलगाडी, शेळ्या, मेढ्यांचे कळप होते. एका रांगेत हा मोर्चा निघाला होता. या आगळ्या-वेगळ्या मोर्चाकडे पाहून रस्त्यारून ये-जा करणारे कुतूहलाने पाहत होते. त्यामुळे साहजिकच शेतकऱ्यांचाही घोषणा देण्यासाठी उत्साह वाढत होता. ‘शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळालाच पाहिजे,’ अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला. एक जूनपासून शेतकरी बेमुदत संपावर जात आहेत. या पार्श्वभूमीवर हा मोर्चा काढण्यात आला.जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा पोहोचल्यानंतर वाजंत्रीचा सूर ऐकून कार्यालयातील कर्मचारीही हा मोर्चा पाहण्यासाठी बाहेर आले. बुधाजी मुळीक हे पोटतिडकीने मागण्या शेतकऱ्यांपुढे मांडत असताना शेळ्या, मेढ्यांही जागच्या जागी शांत उभ्या राहिल्या होत्या. शेतकऱ्यांची ही अनोखी शिस्त पाहून अनेकांनी या मोर्चाला पाठिंबा दिला.