शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

‘हिरवा कंदील’ दिलात;

By admin | Updated: July 9, 2014 00:03 IST

पण ‘लाल दिवा’ कधी ?कृष्णा खोरे उपाध्यक्ष निवड : फलटणकरांचे मुख्यमंत्र्यांसमोर गाऱ्हाणे

कऱ्हाड : बाबा..! रणजित निंबाळकरांना ‘कृष्णा खोरे’च्या उपाध्यक्षपदाबाबत आपण हिरवा कंदील दिलात. आम्ही फलटणमध्ये फटाकेही फोडले अन् गुलालही उधळला; पण पंधरा दिवस झाले तरी अधिकृत पत्र नाही, घोषणा नाही. आता त्यांना लाल दिवा कधी देणार? असे गाऱ्हाणे फलटणच्या कार्यकर्त्यांनी आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर मांडले. यावर जरा धीर धरा असे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले. ‘कृष्णा खोरे’च्या उपाध्यक्षपदी रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचे नाव निश्चित झाल्याची वार्ता २२ जुनला फलटणमध्ये धडकली. मग काय त्यांच्या उत्साही कार्यकर्त्यांनी लगेच फटाक्यांची आतिषबाजी आणी गुलालाची उधळण करीत दिवाळी साजरी केली; पण पंधरा दिवस लोटले तरी त्यांना पेढे वाटायची संधी मिळेना. कारण अजून हातात निवडीचे अधिकृत पत्र कुठेय..!आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण कऱ्हाड दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान सकाळी त्यांच्या निवासस्थानीच फलटणच्या काही निवडक कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री चव्हाणांची भेट घेतली. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यासमोरच आपल्या भावना त्यांनी मांडल्या. फलटणला ताकद देण्यासाठी आपण ‘कृष्णा खोरे’चे उपाध्यक्षपद देण्याचा निर्णय घेताय; पण ते उपाध्यक्षपद लवकर दिले तर त्याचा विधानसभेला फायदा होईल, अशी मते त्यांनी मांडली. त्यावर स्मितहास्य करीत जरा धीर धरा, असा सबुरीचा सल्ला मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना दिला, एवढेच! सुशांत निंबाळकरही मुख्यमंत्र्यांच्या भेटीलाराष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष सुशांत निंबाळकर यांना दोन दिवसापूर्वी फलटण येथे त्यांच्या घरात घुसून राष्ट्रवादीच्याच काही नगरसेवकांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे फलटण येथील राष्ट्रवादीतील राजकीय घडामोडी वाढल्या आहेत. संबंधितांवर गुन्हा नोंद होऊन पोलीस कारवाई झाली असली तरी या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, म्हणून सुशांत निंबाळकर यांनी आज कऱ्हाड दौऱ्यावर असणाऱ्या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची शासकीय विश्रामगृहावर भेट घेतली. यावेळी रणजित नाईक-निंबाळकर त्यांच्यासोबत होते. सुशांत निंबाळकर जखमी स्थितीत त्याठिकाणी आल्याने सर्वांचे लक्ष त्यांच्यावर केंद्रित झाले होते....तर नाईक-निंबाळकरांची हॅट्ट्रिकरणजित नाईक-निंबाळकरांना कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्षपद अधिकृत मिळाले तर नाईक-निंबाळकरांची ही हॅट्ट्रिक ठरणार आहे. यापूर्वी १९९५ ला तत्कालीन आमदार रामराजे नाईक-निंबाळकर, तर १९९८ ला तत्कालीन खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकरांनी हे पद भूषविले आहे. (प्रतिनिधी)