शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

‘जलयुक्त शिवार’साठी युवकांना गती द्या

By admin | Updated: February 18, 2015 23:46 IST

एन.जे. पवार : सकारात्मक उपक्रम राबविण्याचे केले आवाहन

सातारा : ‘आजच्या युवकाला दिशा दिली तर क्रांतिकारी म्हणून पुढे येतील. त्यांना योग्य गती द्या, म्हणजे ‘जलयुक्त शिवार’ अभियान निश्चितपणे यशस्वी होईल,’ अशी अपेक्षा शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन.जे. पवार यांनी व्यक्त केली.शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जलयुक्त शिवार’ अभियानांतर्गत दुष्काळ निवारणात विद्यार्थ्यांचा सहभाग यावर येथील नियोजन भवनात कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत, प्र. कुलगुरू डॉ. अशोकराव भोईटे, विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ. डी. के. गायकवाड, उपजिल्हाधिकारी पराग सोमण, जलतज्ज्ञ डॉ. अविनाश पोळ, शिवाजी विद्यापीठ सिनेट सदस्य अमित कुलकर्णी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जे. पी. शिंदे, अशासकीय सदस्य विजयराव पंडित, सुजित आंबेकर आदी उपस्थित होते.भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून या कार्यशाळेला सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला माजी उपमुख्यमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कुलगुरू डॉ. पवार म्हणाले, ‘शिवाजी विद्यापीठामध्ये विहीर खोदून पाण्याच्याबाबतीत आम्ही स्वयंपूर्ण झालो. तर मग दुष्काळी गावे योग्य नियोजन केल्यास स्वयंपूर्ण का होणार नाहीत.’ जी. श्रीकांत म्हणाले, ‘पावसाचे पडणारे पाणी योग्य उपाययोजना करून ते जमिनीमध्ये जिरविले पाहिजे. काही गावे दत्तक घ्यायची. त्या गावातील पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य घालवून द्यायचे. टँकरमुक्त धोरण याला सर्वोच्च प्राधान्य द्यायचे. विद्यार्थ्यांची ताकद ही खूप मोठी आहे. त्यासाठी या अभियानामध्ये त्यांचा सहभाग हे या अभियानाचे फलित ठरेल.’ अविनाश पोळ म्हणाले,‘भविष्यामधील युद्ध हे पाण्यावरून होईल. त्याचबरोबर शहरी आणि ग्रामीण भाग यांच्यात पाण्यावरून संघर्ष असेल. ‘जलयुक्त शिवार’ अभियान ही एक तुम्हाला संधी आहे. या संधीचा पूर्णपणे वापर करा.’ यावेळी डॉ. भोईटे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. पराग सोमण यांनी स्वागत केले. अमित कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. विजयराव पंडित यांनी आभार मानले. यावेळी जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते. (प्रतिनिधी)