शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

सातारा शिवसेनेला द्या; ९५ची पुनरावृत्ती घडवू

By admin | Updated: September 4, 2014 23:27 IST

ओंबळे-पार्टे : शिवेंद्रसिंहराजेंवर केली जोरदार टिका

मेढा : सातारा-जावली विधानसभा मतदार संघ शिवसेनेला मिळाल्यास १९९५ची पुनरावृत्ती करण्याचा चंग जावळी तालुक्यातील शिवसैनिकांनी बांधला असून हा मतदार शिवसेनेला मिळावा, अशी एकमुखी मागणी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली असल्याची माहिती जावळी तालुक्यातील शिवसेनेचे नेते एकनाथ ओंबळे व एस. एस. पार्टे गुरुजी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सातारा मतदार संघ हा शिवसेनेच्या वाट्याला मिळावा या मुख्य मागणीसह तालुक्यातील शिवसैनिकांच्या भावना जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी या पत्रकार परिषदेचे आयोजन केल्याची माहिती यावेळी एकनाथ ओंबळे व पार्टे गुरुजी यांनी दिली. यावेळी भारतीय विद्यार्थी सेनेचे तालुका प्रमुख सचिन करेंकर, मेढा शहर प्रमुख सचिन जवळ, उपतालुकाप्रमुख संजय सुर्वे, सचिव गणेश पार्टे, प्रशांत तरडे, श्रीहरी गोळे आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना एकनाथ ओंबळे म्हणाले, जावळी तालुक्याने १९९५ मध्ये इतिहास घडविला. त्यानंतर २००२ साली जावळी पंचायत समितीवर आपले वर्चस्व राखले होते. शिवसेनेकडे आज एकही तालुक्यातील मोठा नेता नसूनही गेल्या तीन विधानसभा निवडणुकीत दोन क्रमांकाची मते मिळविली आहेत. आजही प्रत्येक गावातील शिवसैनिकांनी हा विधानभा मतदारसंघ शिवसेनेला मिळावी, अशी मागणी केली आहे. सातारा- जावली विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे मतदार जास्त असून सहयोगी असणाऱ्या भाजप व आरपीआय यांच्या साथीने शिवसेना १९९५ ची पुनरावृत्ती घडवेल, असा ठाम विश्वास ओंबळे यांनी यावेळी व्यक्त केला. (प्रतिनिधी)एकनाथ ओंबळे यांनी विद्यमान आमदार व राष्ट्रवादीवर जोरदार टिका केली. तालुक्यात विकास नुसता कागदावरच झाला असून महू-हातगेघर प्रकल्प, पुनर्वसनाकडे आमदार व पालकमंत्र्यांनी गांभीर्याने लक्ष दिले नाही. आजही तालुक्यात २० गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. जावळी तालुक्यात पवनचक्क्यांचा रस्ता होतो, मात्र इतर रस्त्यांना निधी मिळत नाही. ही जनतेच्या डोळ्यात धुळफेक करण्याचे काम सुरू आहे. या साऱ्याला जनता कंटाळली आहे. शाळांची बोगस बांधकामे, काही गावांमध्ये अजिबात न झालेला विकास याबाबतही यावेळी कडाडून टिका करण्यात आली.