शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
3
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
4
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
5
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
6
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
7
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
8
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
9
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
10
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
11
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
12
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
13
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
14
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
15
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
16
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
17
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
18
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
19
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
20
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण

गीताचा मृत्यू; गुन्हा दाखल होणार

By admin | Updated: May 12, 2015 23:44 IST

ओझर्डे स्फोट : महिनाभराच्या झुंजीनंतर पूजाची सोडली अर्धावर साथ

भुर्इंज : ओझर्डे स्फोटातील गंभीर जखमी गीता रामदास पवार (वय ७) हिची प्रकृती तीन दिवसांनंतर अचानक खालावली. त्यातच उपचारादरम्यान तिचा कण्हेरी, कोल्हापूर येथील रुग्णालयात मृत्यू झाला. तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी विक्रम भिकोबा आमले व त्याच्या साथीदारांवर ३०४ अ कलमान्वये गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली सुरू झाल्या झाल्या आहेत.याबाबत माहिती अशी की, ओझर्डे यात्रेत ९ एप्रिलच्या मध्यरात्री दारूगोळ्याचा स्फोट होऊन गीता व तिची बहीण पूजा दोघी गंभीर जखमी झाल्या होत्या. मात्र, सातारा व तरडगाव येथे प्राथमिक उपचार झाल्यानंतर या दोघी वाचणारच नाहीत, असे समजून त्यांना भुर्इंज येथे गोपाळवस्तीतील झोपडीत आणले. तेथे दोघी तडफडत होत्या. या घटनेचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच शासकीय अधिकाऱ्यांनी पुढाकार घेत दोघींना उपचारासाठी कोल्हापूर येथील सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथे काही दिवसांतच पूजाच्या प्रकृतीचा धोका टळला. तर काही दिवसांनंतर गीताच्या आतड्याची शस्त्रक्रियादेखील यशस्वी झाल्याने गीताही वाचेल, असा विश्वास तेथील डॉक्टरांनी व्यक्त केला होता. झोपडीत वेदनेने तडफडणाऱ्या गीता व पूजाच्या वेदना थांबवण्यात सिद्धगिरी हॉस्पिटलच्या डॉक्टरांना यश आले होते. गीताची प्रकृती अधिक गंभीर असल्याने तिला मलमपट्टी करताना भूल दिली जात होती. एवढी काळजी तेथील डॉक्टर घेत होते. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून गीताची प्रकृती खालावत गेली. अखेर सोमवारी रात्री गीताची प्राणज्योत मालवली. भुर्इंज येथे मंगळवारी सकाळी गीताच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी रवींद्र खेबुडकर, तहसीलदार सदाशिव पडदुणे, सहायक पोलीस निरीक्षक नारायण पवार उपस्थित होते. (वार्ताहर)प्रकृती ढासळत गेली...या दोघींना येथे उपचारासाठी दाखल केले, तेव्हाच त्यांची प्रकृती अतिशय गंभीर होती; मात्र पूजाच्या प्रकृतीचा धोका काही दिवसांतच टळला तर सुमारे २५ दिवसांच्या उपचारानंतर गीताही वाचेल, असा विश्वास होता. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून तिची प्रकृती अचानक ढासळत गेली आणि अखेर तिची प्राणज्योत मालवली. गीताचा मृत्यू आमच्यासाठीही वेदनादायी असून, पूजाची प्रकृती मात्र शंभर टक्केधोक्याबाहेर आहे.- डॉ. अमोल मोहितेगीता पवारच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी यात्रेमध्ये दारूगोळा उडविण्यास आलेला विक्रम आमले याच्यासह त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात येईल.-नारायणराव पवार, सहायक पोलीस निरीक्षक