शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

झिंगलेल्या बालकांचं जमावाकडून मुंडन

By admin | Updated: March 22, 2015 00:15 IST

तांदुळआळीतील धक्कादायक प्रकार : मद्यविक्रेत्यांवर कारवाई करण्याची जोरदार मागणी

सातारा : मोठ्यांची नक्कल छोट्यांनी केली तर आई-वडील त्याचे कौतुक करतात. परंतु हिच नक्कल जर आपल्या मुलाने मद्यपी तळीरामाची केली तर आई-वडीलच नाही तर संपूर्ण समाजाला चिंतेत पाडणारी गोष्ट ठरते. असाच एक प्रकार शनिवारी येथील राजवाडा परिसरात घडला. येथील राजवाडा परिसरातील प्रतापसिंह महाराज नगरवाचनालयाजवळ तांदुळआळीत दुपारी बाराच्या सुमारास अवघ्या आठ-दहा वर्षांची चार बालके बसली होती. त्यांच्याजवळ पाण्याची बाटली आणि त्यामध्ये मद्य होते. तर एका कागदावर चकना शेंगदाणे-फुटाणे होते. आळीपाळीने ही बालके बाटलीतील मद्य पित होते. त्यानंतर शेंगदाणेही खात होते. काहीवेळानंतर त्यातील दोघांना उलट्या होऊ लागल्या. तेथे जवळच असलेल्या काही लोकांच्या हा प्रकार निदर्शनास आला. त्यानंतर नागरिकांनी त्या बालकांकडे ‘गाव कोणते, तुम्ही इथे कसे आलात,’ याविषयी चौकशी केली. परंतु त्या बालकांनी नागरिकांनाही थांगपत्ता लागू दिला नाही. ‘पोलिसांच्या ताब्यात देतो,’ असे ज्यावेळी त्यांना धमकावण्यात आले. तेव्हा त्यांनी आपली ओळख सांगितली. झालेला प्रकार त्यांच्या पालकांच्या कानावर घालण्यासाठी काहीनी फोनही लावले. परंतु त्यांच्या पालकांशी संपर्क होऊ शकला नाही. शेवटी या बालकांनी केलेल्या कृत्याची शिक्षा म्हणून नागरिकांनी पुढाकार घेऊन त्यांचे मुंडन केले. नंतर त्यांना समज देऊन सोडून देण्यात आले. पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवले पाहिजे, असे यावेळी नागरिकांतून बोलले जात होते. लहानपणीच मुलांवर चांगले संस्कार घडावेत, यासाठी पालक लक्ष देतात; परंतु सध्या पोटापाण्यासाठी दिवसभर कष्ट करणाऱ्या पालकांच्या मुलांकडे कोण बघणार. आपली मुले दिवसभर काय करतात, याचा थांगपत्ता पालकांना नसतो. मुले शाळेत जातात, एवढेच समाधान आजच्या पालकांना आहे की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. (प्रतिनिधी)