शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

भातांच्या शिवारात घुमतेय भलरीची हाळी

By admin | Updated: July 24, 2015 00:39 IST

बळीराजा शेतात व्यस्त : कास-बामणोली परिसरात भात लावणीस वेग

पेट्री : सातारा शहराच्या पश्चिमेला असणाऱ्या कास-बामणोली परिसरात भात लावणीस सुरुवात झाली असून, परिसरातील शेतकरी डोक्यावर इरले, पोती व कागदांची टापूस बांधून मुसळधार पावसात भाताची लावणी करण्यात मग्न झाले आहेत. तसेच भात शिवारात ‘रामा हो राम राम... रामाच्या बागेमध्ये हो बागेमध्ये, पाऊस पडतो झिरीमिरी झिरीमिरी...माज्या बंधूच्या शेतावरी, ध्यान मला रामाचं ध्यान मला रामाचं... मारुतीला रात्र झाली द्रोणागिरी जायाचं, शंकर म्हणे पार्वते...कुणाला तू ओढीत होतीस कुणाला तू सोडीत होतीस, वाईचे डोंगरी गजबारल्या तोरणी..’ अशा कित्येक पांरपरिक भलरी गीतांचा आवाज निनादू लागला आहे कास-बामणोली परिसर हा घाटमाथा म्हणून ओळखला जातो. हा परिसर सह्याद्रीच्या पर्वतरांगांनी वेढलेला आहे . या ठिकाणी पावसाचे प्रमाण अधिक असते. येथील डोंगरउतारामुळे पावसाचे पाणी पूर्णपणे वाहून जाते. यामुळे जमिनीत कमी प्रमाणात पाणी मुरते. जमिनी लालमाती व मुरमाड असल्याने येथील शेतकरी मोठ्या प्रमाणावर भात, वरी ही पिके घेतात. या भागातील जमिनी निकृष्ट, तीव्र डोंगर उतार व लालमातीच्या असल्यामुळे पिके चांगली येण्यासाठी खूप मशागत करावी लागते. येथील शेतकरी डिसेंबर , जानेवारी महिन्यांत ऐन जांभळ, उंबर अशा झाडांची कवळे बांधतात. होळीनंतर तरव्यांची भाजणी केली जाते. पावसाळ्याला सुरुवात होताच जून महिन्यात याच तरव्यांमध्ये भातांच्या बियाण्यांची पेरणी करून लावणीसाठी भाताचे रोप तयार केले जाते. साधारणपणे २१ ते ३० दिवसांपर्यंत रोपांची योग्य वाढ झाल्यानंतर पांरपरिक पद्धतीने औताच्या साह्याने भाताच्या वावरात चिखल करून त्यामध्ये तरव्यातील भातांच्या रोपांची लावणी करण्यात येते .डोक्यावर इरलीचा आधार घेऊन पोती व कागदांची टापूस बांधून मुसळधार पावसात शेतकरी भात लावणी करत आहेत. दरम्यान, भात लावणी करत असताना करमणुकीसाठी व कामाचा कंटाळा येऊ नये, यासाठी तालावर भलरी गीते म्हणताना दिसत आहेत. भाताची लावणी करण्यासाठी अनेकांची आवश्यकता असल्याने लावणी करताना एकमेकांना मदत करत आहेत. त्यामुळे भल्या पहाटे सुरू होणारा बळीराजाचा दिवस संध्याकाळी सात पर्यंतही शेतातच मावळतो. (वार्ताहर)परिसरातील संपूर्ण शेती पावसावर अवलंबून आहे. काही तुरळक ठिकाणी अजूनही ओढे अथवा विहिरीतील पाणी साठवून भात लावणी होत आहे. भात लावणी करताना आजही ही पांरपरिक भलरी गीते या परिसरात अस्तित्व टिकवून आहेत, यामुळे कामाचा कोणताही ताण जाणवत नाही. - अमोल भोसले, शेतकरी गोगवे, ता.महाबळेश्वरवस्तू अथवा पैशांचा कोणताही मोबदला न घेता भात लावणी करण्यासाठी अनेकजण एकमेकांच्या कामासाठी मदत करतात, यालाच या परिसरात ‘पैरा’ म्हणतात. यामुळे कमी वेळात भात लावणी होण्यास मदत होते. तसेच सर्वांच्या भात लावण्या सुरू असल्याने औताला मोठ्या प्रमाणावर मागणी होत आहे .