शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

संत साहित्यासाठी शहा यांंना बळ मिळावे

By admin | Updated: August 28, 2016 00:02 IST

सदानंद मोरे : समाजाच्या उद्धारासाठी जीवन; साताऱ्यात ‘जीवनगौरव’ पुरस्कार प्रदान

सातारा : ‘वयाच्या ८३ व्या वर्षी ही उर्मी आणि प्रचंड ऊर्जा घेऊन आज एखाद्या तरुणाला लाजवेल असे कार्यमग्न राहत साऱ्या समाजाच्या उद्धारासाठी एक व्रत म्हणून जीवन जगणाऱ्या रमणलाल शहा यांना आता पुढील संत साहित्याच्या अभ्यास व निर्मितीसाठी परमेश्वराने मोठे बळ आणि ऊर्जा द्यावी,’ असे मत संत साहित्याचे गाढे अभ्यासक, मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले. येथील सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने दिला जाणारा पहिला ‘जीवनगौरव’ पुरस्कार येथील ज्येष्ठ ज्योतिषतज्ज्ञ प्राचार्य रमणलाल शहा यांना प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. डॉ. प्रतिभा मुदगल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभात सातारा विकास आघाडीचे पक्षप्रतोद अ‍ॅड. दत्तात्रय बनकर, दीपलक्ष्मीचे संस्थापक अध्यक्ष शिरीष चिटणीस, नगरवाचनालयाचे कार्यवाह डॉ. शाम बडवे, पतसंस्थेचे महाव्यवस्थापक विनायक भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना रमणलाल शहा म्हणाले, ‘एखाद्याला पुरस्कार मिळणे म्हणजे त्याच्या कार्याची समाजाने दिलेली ही पोहोच पावती होय. सातारा जिल्हा तसेच अनेक ज्ञात, अज्ञात ठिकाणच्या प्रेम करणाऱ्या माणसांच्या स्रेहाने मी चिंब झालो आहे. साताऱ्याच्या व्यासपीठावर हा पुरस्कार मला प्रथमच मिळत आहे याचा मनस्वी आनंद वाटतो. संत तुकारामांच्या वरील ‘आनंदाचे डोही’ या पुस्तकाची पहिली आवृत्ती केवळ १० महिन्यांत संपली म्हणून आज या पुस्तकाची दुसरी आवृत्ती आपण प्रकाशित करत आहोत. आज समाजात वाढत चालेला दुरावा, तेढ, नाते संबंधातील दुरावा वाढत आहे. हे टाळण्यासाठी मन सतत प्रसन्न आणि आनंदी ठेवा चित्ती समाधान ठेवले नाही तर आपले आरोग्य चांगले राहणार नाही. मी वयाच्या ९० पर्यंत संत साहित्यावर लिहित राहणार आहे व त्यासाठी परमेश्वराने मला बळ द्यावे.’ या समारंभास अर्थतज्ज्ञ पी. एन. जोशी, अरुण गोडबोले, संभाजीराव पाटणे, प्राचार्य पुरुषोत्तम शेठ, बाळासाहेब प्रभूणे, नितीन शहा, विजया शहा, केतन शहा, विनायकराव आगाशे, दीपलक्ष्मीच्या उपाध्यक्षा सुरेखा रानडे, महालक्ष्मी पतसंस्थेचे अध्यक्ष अन्वर शेख, बाळासाहेब नारकर, राजेश चिटणीस, साहेबराव होळ, सी. के. शहा, रमण वेलणकर, वसंतराव फडतरे, विठ्ठलराव जाधव, आप्पा शालगर, शिल्पा चिटणीस आदी उपस्थित होते. डॉ. शाम बडवे यांनी सूत्रसंचालन केले. विनायक भोसले यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)