शहरं
Join us  
Trending Stories
1
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
2
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
3
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
7
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
8
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
9
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
10
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
11
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
12
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
13
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
14
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
15
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
16
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
17
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
18
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
19
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
20
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

सामान्य जनतेला हवे विकासाचे पक्षीय धोरण

By admin | Updated: November 9, 2016 22:53 IST

विकासाचा मुद्दा अजेंड्यावर : अनेक समस्या आवासून

विकासाचा मुद्दा अजेंड्यावर : अनेक समस्या आवासून; उदासिनतेचे धोरण विकासाच्या घोडदौडीतील मोठा अडसर खंडाळा : खंडाळा शहरातील ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये झाले. वास्तविक प्रशासकीय पातळीवर हा बदल दिसत असला तरी शहराच्या विकासात्मक बाबींमध्ये परिवर्तन अपेक्षित आहे. सध्या या ठिकाणच्या काही बाबतीत विकासकामांना मूर्त स्वरूप मिळाले असले तरी अनेक समस्याही ‘आ’वासून उभ्या आहेत. नगरपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून या समस्यांच्या विळख्यातून शहराला बाहेर काढणारे पक्षीय धोरण सामान्य जनतेला अपेक्षित आहे. खंडाळ्याची सत्ता गेली अनेक वर्षे काँग्रेसच्या ताब्यात आहे. पंचायत समितीचे सदस्य अनिरुद्ध गाढवे यांनी मूलभूत सुविधांचा विचार करून विकासात्मक कामे केली आहेत. शहराच्या मुख्य रस्त्यांचे डांबरीकरण, पाणीपुरवठा योजना, गावातील रस्त्यांच्या पथदिवे, गावठाणातील बंदिस्त गटार योजना, स्मशानभूमीचे सुशोभीकरण अशा विविध बाबतीत कामे झाली आहेत. मात्र, शहराचा आवाका पाहता केवळ एवढ्यावरच लोकांच्या गरजा भागू शकत नाहीत. ऋतुमानानुसार कित्येक समस्या पुढे येत राहिल्या आहेत. मात्र, केवळ चालढकलीचे राजकारण करीत विकासकामे प्रलंबितच राहिली आहेत. त्यामुळे या निवडणुकीत अनेक समस्या राजकीय व्यासपीठावर डोके वर काढणार असल्याचे चित्र समोर आले आहे. खंडाळा शहराचे मूळ गावठाण आणि त्याभोवती विस्तारलेला भाग याचा विचार करता नवीन वसाहती आणि गल्लींच्या रस्त्यांची कामे, बाहेरील रस्त्यांच्या कडेची उघड्यावरची गटारे, रस्त्यांची स्ट्रीट लाईट, मुख्य रस्त्यांचे अतिक्रमण हा तर कळीचा प्रश्न आहे. याशिवाय शहराचे सांडपाणी निचरा व व्यवस्थापन, सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था, मुताऱ्यांची वाणवा, मुख्य चौकांचे सुशोभीकरण, चिल्ड्रन पार्क, जलशुद्धीकरण प्रकल्प, ओढ्याची स्वच्छता, आठवडी बाजाराचे पुनर्वसन यासारख्या अनेक समस्या तशाच खितपत पडल्या आहेत. सामान्य माणसांच्या जीवनात ज्या गोष्टींची दैनंदिन व्यवहारात गरज भासते. त्याबाबतीत उदासिनतेचे धोरण हे विकासाच्या घोडदौडीतील मोठा अडसर आहे. त्यामुळेच या निवडणुकीत पक्षीय पातळीवर उतरलेल्या पॅनेलकडून सामान्य जनतेला विकासाचे पक्षीय धोरण आवश्यक आहे. वास्तविक, सर्वच निवडणुकीत सत्ताधारी पक्षांकडून विकासाचं तुणतुणं वाजविलं जातं. केलेल्या कामाचा प्रसार करण्याचं धोरण राबविलं जातं. मात्र ‘अजूनही काही बाकी आहे’ याची जाणीवही आवश्यक आहे. खंडाळ्याच्या राजकारणाची परिस्थिती यापेक्षा वेगळी आहे, असे म्हणता येणार नाही; पण किमान गावचं गावपण टिकवणं आणि सामाजिक सलोखा राखणं याबाबतीत तरी सत्ताधाऱ्यांनी एक पाऊल पुढे ठेवले आहे. मात्र, शहराला आवश्यकता कशाची आहे आणि सत्ताधारी नेमके कुठे कमी पडले याचा लेखाजोखा जनतेसमोर मांडण्यासाठी विरोधकांना हीच योग्य वेळ असल्याने सर्वांनीच कंबर कसली आहे. खंडाळा नगरपंचायतीत विकासकामे हा मुख्य मुद्दा सत्ताधारी आणि विरोधक यांच्या अजेंड्यावर राहणार हे निश्चित, त्यामुळे ही निवडणूक लक्षवेधी ठरणार असल्याने सगळ्यांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)