शिरवळ : ‘रात्रगस्त तेही केसुर्डीमध्ये’ नको रे बाबा कोणी सांगितले आहे, पोलिसांचे झंझट मागे लावायला. त्यापेक्षा चोरी झाली तर आक्रोशच करावा लागेल ना...’ असे उद्गार आहेत. केसुर्डीमधील तरुण व ग्रामस्थांचे गावाकडे वळाली नसेल तर नवलच कारण गेल्या अनेक दिवसांपासून केसुर्डी याठिकाणी चोरट्यांनी धुमाकुळ घातला आहे. ८ मे रोजी ही केसुर्डीमधील प्रवीण पोपट ढमाळ यांच्या बंद घराचे कुलूप तोडत सुमारे ५ लाखांच्या आसपास सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला होता. या संबंधित चोरट्यांचा तपासही आजतागायत पोलिसांना लागलेला नाही. त्यामुळे लहान-मोठ्या चोऱ्यांना पायबंद घालण्यासाठी केसुर्डी येथे तरुणांनी व ग्रामस्थांनी पोलीसांच्या मदतीने गावात चोरट्यांना जेरबंद करण्यासाठी रात्रगस्तीचा निर्णय घेतला. मात्र हाच निर्णय केसुर्डी येथल तरुणांच्या व ग्रामस्थांच्या अंगलट आलेला दिसून येत आहे.ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार व पोलीस अधीक्षकाला दिलेल्या निवेदनानुसार, चोरीच्या पार्श्वभूमीवर १२ मे रोजी रात्रगस्त सुरू असताना रात्री दीड ते दोनच्या दरम्यान गावात मोटारसायकलवरून (बिगर नंबरच्या) एकजण संशयास्पदरित्या गावात आल्याचे निदर्शनास आल्यानंतर गावकऱ्यांनी संबंधिताला हटकले असता तो पळाला. त्याचा पाठलाग करीत असताना तो आडमार्गाने घुसल्याने संबंधित इसम हा मोटारसायकलवरुन जोरदार पडला व त्याला दुखापत झाली. दरम्यान, ग्रामस्थांनी संबंधिताला पोलिसांच्या स्वाधीन करीत संबंधिताकडे आढळून आलेली बंदुक व इतर साहित्यही पोलिसांच्या स्वाधीन केले असे.असे असतानाही संबंधिताने काही दिवसानंतर केसुर्डी येथील काही तरुणांविरुद्ध व ग्रामस्थांविरुद्ध खोटी फिर्याद दिली असल्याचा आरोप केसुर्डी ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे केसुर्डी ग्रामस्थावर अन्याय झाला असल्याची भावना केसुर्डीकरामध्ये निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)केसुर्डी गावामध्ये औद्योगिकीकरणामुळे मोठ्या प्रमाणात चोऱ्यांचे सत्र वाढले आहे. याठिकाणच्या नागरिकांकडे मुबलक पैसा असल्याची भावना चोरट्यांमध्ये निर्माण झाल्याने चोरट्यांनी केसुर्डी गावाला लक्ष केले आहे. पोलिसांनी चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.- रवी ढमाळ, केसुडीरात्रगस्त बंदकेसुर्डी ग्रामस्थांनी रात्रगस्तही गावातील बंद करुन टाकली आहे. याचाच परिपाक म्हणजे आज झालेली सुमारे १२ तोळेच्या आसपास सोने-चांदीच्या दागिन्यांची रोख रकमेची चोरी त्यामुळे रात्रगस्त म्हटले तरी सध्याच्या परिस्थितीमध्ये केसुर्डी ग्रामस्थांच्या अंगावर काटा येत असून नसती झंझट मागे नको म्हणत केसुर्डी ग्रामस्थ काढता पाय घेत आहे. दरम्यान, संबंधित गुन्हा हा राजकीय दबावामुळे दाखल झाला असल्याचा आरोपही केसुर्डी ग्रामस्थांनी केला आहे.
गस्त म्हटलं की अंगावर येतो काटा!
By admin | Updated: June 10, 2015 00:24 IST