शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

कऱ्हाड तालुक्यात दोन ठिकाणी गॅसचा भडका

By admin | Updated: October 9, 2016 23:57 IST

आठ गंभीर जखमी : कोपर्डेत सासू, सुनेसह चौघे, तर बनवडीत दाम्पत्यासह दोन मुले भाजली

कोपर्डे हवेली : कऱ्हाड तालुक्यातील कोपर्डे हवेली व बनवडी येथे शनिवारी रात्री काही अंतराच्या फरकाने गॅसचा भडका उडाला. या दोन्ही वेगवेगळ्या घटनांत दोन कुटुंबांतील आठ गंभीर, तर एकजण वाचविताना जखमी झाला. या जखमींवर कऱ्हाड तसेच सांगलीच्या खासगी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. कोपर्डे हवेली येथे संजय गुंगा भोसले हे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. शनिवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास भोसले कुटुंबातील समाबाई भोसले या गॅसवर स्वयंपाक करीत होत्या. त्यांची सून मंगल याही त्यांना मदत करीत होत्या. कुटुंबातील संदेश व ऋतुराज ही दोन मुले स्वयंपाकघरात खेळत होती. स्वयंपाक सुरू असतानाच अचानक गॅसचा प्रवाह वाढला. हा गॅस स्वयंपाकघरात सर्वत्र पसरला. तसेच अचानक भडका उडाला. त्यामुळे समाबाई, मंगल, ऋतुराज व संदेश हे चौघे जखमी झाले. घटनेनंतर काही सेकंदच घरात आगीच्या ज्वाळा पसरल्या. घटना निदर्शनास येताच परिसरातील ग्रामस्थांनी त्याठिकाणी धाव घेतली. जखमींना स्वयंपाकगृहातून बाहेर काढताना गणेश भोसले यांनाही आगीची झळ बसली. त्यामुळे तेही भाजले. ग्रामस्थांनी जखमींना उपचारार्थ कऱ्हाडच्या वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात हलविले. मात्र, त्याठिकाणी आवश्यक सोयी-सुविधा नसल्याने चौघांनाही पुढील उपचारासाठी सांगलीला हलविण्यात आले आहे. चौघांचीही प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. दरम्यान, बनवडी येथेही शनिवारी रात्री भेसके कुटुंबीयांच्या घरात गॅसचा भडका उडाला. त्यामध्ये भेसके पती, पत्नीसह त्यांची दोन मुले जखमी झाली. बनवडी येथे रस्त्यालगत असलेल्या प्रसाद रेसिडेन्सी इमारतीच्या ‘एस तेरा’ या फ्लॅटमध्ये प्रा. उमाकांत भेसके हे पत्नी व दोन मुलांसमवेत राहतात. शनिवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास जेवण आटोपल्यानंतर भेसके कुटुंबीय झोपी गेले. त्यानंतर रात्री साडेअकरा ते बारा वाजण्याच्या दरम्यान बाथरूममधील गॅसगिझरला गळती लागली. दारे व खिडक्या बंद असल्याने गॅस घरभर पसरला. हा गॅस देवघरातील निरांजनापर्यंत पोहोचल्यानंतर मोठा भडका उडाला. त्यामध्ये उमाकांत यांच्यासह त्यांची पत्नी व दोन मुले जखमी झाली. आरडाओरडा झाल्याने परिसरातील नागरिकांनी त्याठिकाणी धाव घेऊन जखमींना उपचारार्थ कऱ्हाड येथील रुग्णालयात हलविले.चौघांनाही साताऱ्याच्या शासकीय रुग्णालयात हलविले आहे.