लोणंद : ‘लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजार आवारात गुरुवार, दि. २ रोजी झालेल्या कांदा बाजारात गरवा ६९२ पिशवी, तर लाल कांद्याची १७०० पिशवी आवक झाली आहे,’ अशी माहिती लोणंद बाजार समितीचे सभापती राजेंद्र तांबे व उपसभापती दत्तात्रय बिचुकले यांनी दिली.
गरवा कांदा नंबर एक १३०० ते १६०० रुपये, कांदा नं. दोन १०५० ते १३००, गरवा कांदा गोल्टी ६०० ते १०५० रुपये दर निघाले, तर लाल कांदा नंबर एक १३०० ते १७०० रुपये, कांदा नं. दोन १००० ते १३००, गरवा कांदा गोल्टी ७०० ते १००० रु. दर निघाले. शेतकऱ्यांनी आपला शेतमाल चांगला वाळवून व निवडून लोणंद बाजार समितीमध्ये विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सचिव विठ्ठल सपकाळ यांनी केले आहे.
जनावरे बाजारात म्हैस ४०,००० ते ७०,००० (आवक १० नग) गाय ५५,००० ते ६५,००० (आवक ६० नग), शेळ्या ४२०० ते १६,००० (आवक १७०० नग), मेंढ्या ६००० ते १७००० (आवक २१०० नग), बोकड ५००० ते २५,००० रुपये (आवक ६०० नग) अशाप्रकारचे बाजारभाव लोणंद बाजारात पाहावयास मिळाले.