शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

‘गरुडझेप सावित्रीच्या खंडाळ्याची’ क्रांती घडवेल

By admin | Updated: August 9, 2016 23:52 IST

रामराजे नाईक-निंबाळकर : खंडाळ्यात पंचायत समितीच्या शैक्षणिक उपक्रमास प्रारंभ

खंडाळा : ‘संस्कारक्षम वय असलेली भावी पिढी गुरुजनांच्या हाती आहे. त्यांच्यावर योग्य संस्कार घडविण्याबरोबरच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या इंग्रजी अध्ययनाची क्षमता वाढविण्यासाठी शिक्षणाच्या नवीन तंत्रज्ञानाची गरज आहे. खंडाळा तालुक्यात शिक्षण क्षेत्रात क्रांती घडविणारा प्रकल्प गरुडझेप घेईल, असा विश्वास व्यक्त करीत योग्य परिवर्तन घडल्यास या ‘गरुडझेप सावित्रीच्या खंडाळ्याची’ या प्रकल्पातून राज्याला नवे धोरण देऊ,’ असे मत राज्य विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केले.खंडाळा पंचायत समितीच्या वतीने प्राथमिक शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविणारा ‘गरुडझेप सावित्रीच्या खंडाळ्याचा’ हा नवा शैक्षणिक उपक्रम हाती घेण्यात आला. त्याच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार मकरंद पाटील, आ. प्रभाकर घार्गे, शिक्षण सभापती सतीश चव्हाण, उपजिल्हाधिकारी वाघमारे, प्रांताधिकारी अस्मिता मोरे, शिक्षणाधिकारी पुनिता गुरव, उपशिक्षणाधिकारी संध्या गायकवाड, तहसीलदार शिवाजी तळपे, सभापती नितीन भरगुडे-पाटील, उपसभापती सारिका माने, सदस्य रमेश धायगुडे, दीपाली साळुंखे, अनिरुद्ध गाढवे, अनिता शेळके, दीपा बापट आदी प्रमुख उपस्थित होते. आमदार कमरंद पाटील म्हणाले, ‘खंडाळा तालुक्याने क्रांतीदिनाच्या निमित्ताने क्रांतीकारी पाऊल उचलले आहे. एक वैचारिक तालुका म्हणून खंडाळ्याकडे पाहिले जाते. सावित्रीबाई फुले यांच्या नावाने सुरू होणारा प्रकल्प राज्यात नावलौकिक घडवेल. विद्यार्थ्यांना सर्वांगीण गुणांचा विकास करण्यासाठी या उपक्रमातून क्रांती घडेल.’ या कार्यक्रमाच्या वेळी या नवीन प्रकल्पाला दिशादर्शक करणाऱ्या ‘मार्गदर्शक पुस्तिकेचे’ प्रकाशन करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात लेझीम पथकाने लहन मुलांचा कला कौशल्याचे अनोखे दर्शन घडविले. यावेळी पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थितहोते. (प्रतिनिधी)