शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेच्या आवारातच कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 23:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्कम्हसवड : पालिकेच्या कर्मचाºयांनी गोळा केलेल्या कचºयाची ट्रॉली तीन दिवसांपासून आंबेडकर नगरात कचºयासह उभी करण्यात आली आहे. परिणामी सर्वत्र दुर्गंधीचे साम्राज्य पसरल्याने व आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याने संतप्त नागरिक व विरोधी पक्षातील पदाधिकाºयांनी कचºयाने भरलेली ट्रॉली रविवारी रात्री पालिकेच्या दारात आणून रिकामी केली. तसेच पालिकेच्या कारभाराचा निषेध व्यक्त ...

लोकमत न्यूज नेटवर्कम्हसवड : पालिकेच्या कर्मचाºयांनी गोळा केलेल्या कचºयाची ट्रॉली तीन दिवसांपासून आंबेडकर नगरात कचºयासह उभी करण्यात आली आहे. परिणामी सर्वत्र दुर्गंधीचे साम्राज्य पसरल्याने व आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याने संतप्त नागरिक व विरोधी पक्षातील पदाधिकाºयांनी कचºयाने भरलेली ट्रॉली रविवारी रात्री पालिकेच्या दारात आणून रिकामी केली. तसेच पालिकेच्या कारभाराचा निषेध व्यक्त केला.याबाबत अधिक माहिती अशी की, पालिकेच्या वतीने शहरातील कचरा दररोज गोळा केला जातो. तीन दिवसांपूर्वी कर्मचाºयांनी ट्रॉलीमध्ये कचरा गोळा केला. कचºयाने भरलेली ही ट्रॉली येथील आंबेडकर नगरात उभी होती. तीन दिवसांपासून ट्रॉली एकाच ठिकाणी उभी असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही गंभीर झाला होता.दुर्गंधीमुळे संतप्त झालेल्या येथील रहिवाशांनी तसेच विरोधी पक्षातील नागरिकांनी रविवारी रात्री कचºयाने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली थेट पालिकेसमोर घेऊन आले. याठिकाणी नागरिकांनी ट्रॉलीतील कचरा रिकामा करून पालिकेचा निषेध व्यक्त केला.ट्रॅक्टर चालकासह तिघांवर गुन्हापालिकेच्या प्रवेशद्वारावर कचरा टाकल्याप्रकरणी पालिकेच्या वतीने पालिकेतील काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते अखील काझी, माजी नगरसेवक संजय सोनवणे, ट्रॅक्टर चालक उमेश कोळी या तिघा जणांवर म्हसवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालिकेचे कर्मचारी सुनील माडे यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, फिर्यादीत म्हटले आहे की, ‘आंबेडकर नगरात डिझेल संपल्यामुळे ट्रॅक्टर ट्रॉली उभी करण्यात आली होती. ट्रॉलीत स्वच्छता करतेवेळी गोळा करण्यात आलेला कचरा व गटारातील गाळ भरण्यात आलेला होता. रविवारी रात्री पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास अचानक पालिकेच्या प्रवेशद्वारावर कचºयाने भरलेला ट्रॅक्टर आला. प्रवेशद्वारासमोर कचरा ओतून संबंधित तिघांनी सुपरवायझर प्रवीण मंडले यांना ‘जर कचरा उचलला तर तुम्हाला खूप महागात पडेल’ असे म्हणून उपस्थित सफाई कामगारांना शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.