शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

गणपती मंडप आता चक्क नटबोल्टावर

By admin | Updated: September 1, 2016 00:56 IST

भारतमाता मंडळाचा उपक्रम : वर्षाकाठी लाखो रुपयांची बचत, रस्त्यांची होणारी दुर्दशा थांबणार

सातारा : सदर बझार येथील भारतमाता मंडळाने पहिल्यांदाच खड्डेविरहित मंडप घालण्याचा निर्णय घेतला असून, अवघ्या आठवड्याभरातच स्केअर पाईपने सांगाडा तयार करून नटबोल्टच्या साह्याने मंडप उभारला आहे. यामुळे मंडपासाठी होणारा खर्च आणि रस्त्यावर खड्डेही होणार नसल्याने मंडळाने दुहेरी उद्देश साध्य केला आहे. मंडळातर्फे गणेशोत्सव व दुर्गोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. यासाठी वर्षाला १ लाखापर्यंत मंडळाला खर्च करावा लागतो. हा खर्च वाचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन लोखंडी मंडपाची संकल्पना मांडली आणि सात दिवसांतच ही कल्पना प्रत्यक्ष उतरवली. दरवर्षी उत्सव काळात मंडप उभारण्यासाठी २० ते २२ खड्डे खोदले जात होते. तर मंडप बांधण्यासाठी १५ दिवसांचा अवधी लागत होता. परंतु आता तयार करण्यात आलेला मंडप अवघा १ ते २ दिवसांतच नटबोल्टद्वारे मंडप पूर्ण केला जात आहे. दरम्यान, या मंडपाची उंची साधारण २२ फुटांची करण्यात आली आहे. ३० बाय २५ चौरस मीटर सांगाडा रुंदी आहे. उंचीसाठी वापरण्यात आलेला सांगाडा दोन टप्प्यांत बनविण्यात आला असल्याने १६ आणि २२ फूट उंचीचा मंडप उभारण्यात येणार आहे.या मंडपामुळे रस्त्यावर खड्डे होणार नसल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)कार्यकर्ते बनले फिटर..लोखंडी सांगाड्याने बनविण्यात आलेले हे मंडप अगदी कोणीही उभारू शकतात. केवळ एकाच दिवसात नटबोल्टने हे मंडप उभारणे शक्य आहे. तसेच हे मंडप खोलणेही तेवढेच शक्य आहे. त्यामुळे सध्या हे मंडप उभारण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते पाना-पक्कड घेऊन नटबोल्ट आवळण्यासाठी फिटरचे काम करत आहेत. एकही खड्डा न खोदता हे मंडप २३ फूट उंचीपर्यंत कार्यकर्ते बांधू लागले असून, या उपक्रमाने मंडळाचे कौतुक होत आहे. शिक्षणासाठी खर्च करणार...भारतमाता मंडळातर्फे दरवर्षी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी गणपती व दुर्गा उत्सवात विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व शारीरिक स्पर्धा घेतल्या जातात. यातून बक्षीसपात्र विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात बक्षिसेही दिली जातात. आता मंडपामुळे मंडळाच्या वाचणाऱ्या पैशातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचे साहित्य देण्याचा मानस असल्याचे यावेळी मंडळाच्या सभासदांनी ‘लोकमत’ला सांगितले.लाखो रुपयांची बचत...गणेशोत्सव आणि दुर्गोत्सवासाठी दरवर्षी लाखो रुपये मंडपाला भाडे द्यावे लागत होते. परंतु आता लोखंडी नटबोल्टचा मंडप तयार केला असून, याला जवळपास २ लाख रुपये खर्च झाला असला तरी हा मंडप कायमस्वरूपी वापरता येणार असल्याने दरवर्षी मंडळाची लाखो रुपयांची बचत होणार आहे.- सतीश कांबळे, अध्यक्ष, भारतमाता मंडळ