पाचजणांना अटक; दागिने विकत घेणारा कोल्हापूरचा सराफ जाळ्यात; तेरा तोळे दागिने जप्तसातारा : शहर व परिसरात दिवसा आणि रात्री घरफोडी करणाºया टोळीचा गुन्हे प्रकटीकरण शाखेने पर्दाफाश केला असून, या टोळीकडून दागिने विकत घेणाºया कोल्हापुरातील एका सराफाचाही यामध्ये समावेश आहे. त्यांच्याकडून सुमारे साडेचार लाखांचे तेरा तोळ्यांचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी खंडेराव धरणे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.संकेत दिनेश राजे (वय २५), संजय एकनाथ माने (५१,रा. भीमाबाई आंबेडकर झोपडपट्टी, सातारा), संतोष नारायण मंझाले (२५, रा. जोशीनगर, कोल्हापूर), सराफ व्यावसायिक महेश मारुतराव झोपडेकर (५१, रा. महादेव गल्ली, गुजरी, कोल्हापूर), राजुगोंडा बाबूराव पाटील (रा. कळंबा, कोल्हापूर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.रेकॉर्डवरील काही गुन्हेगार सातारा शहर व परिसरात दिवसा आणि रात्री घरफोडी करत असल्याची माहिती पोलीस नाईक प्रवीण फडतरे यांना मिळाली. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक समाधान चवरे यांनी त्यांच्या टीमला सतर्क केले. विविध गुन्हे दाखल असलेल्या संकेत राजे याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. यावेळी त्याने सात महिन्यांपूर्वी शहरात आपल्या इतर साथीदारांसमवेत चार घरफोड्या केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी राजे याच्या साथीदारांना अटक केली. या टोळीने चोरलेले दागिने कोल्हापूरमधील सराफ व्यावसायिक महेश झोपडेकर याला विकल्याचे सांगितले. त्यानंतर सातारा पोलिसांनी कोल्हापुरात जाऊन झोपडेकरला व त्याला दागिने देण्यासाठी मध्यस्थी करणाºया राजुगोंडा पाटील यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले.त्यांच्याकडून एक चेन, एक मंगळसूत्र, दोन पाटल्या, सहा बांगड्या, एक सोन्याची लगड असा तेरा तोळ्यांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. या टोळीकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.वरिष्ठ पोलिस निरीक्षक नारायण सारंगकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरणचे समाधान चवरे, सहायक फौजदार एल. बी. शेख, प्रवीण फडतरे, संतोष महामुनी, सोमनाथ शिंदे, प्रदीप मोहिते, अविनाश चव्हाण, पंकज ढाणे, शिवाजी भिसे, सुर्वणा बोराटे यांनी सहभाग घेतला.
साताºयात चोºया करणारी टोळी गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 00:02 IST
पाचजणांना अटक; दागिने विकत घेणारा कोल्हापूरचा सराफ जाळ्यात; तेरा तोळे दागिने जप्तसातारा : शहर व परिसरात दिवसा आणि रात्री घरफोडी करणाºया टोळीचा गुन्हे प्रकटीकरण शाखेने पर्दाफाश केला असून, या टोळीकडून दागिने विकत घेणाºया कोल्हापुरातील एका सराफाचाही यामध्ये समावेश आहे. त्यांच्याकडून सुमारे साडेचार लाखांचे तेरा तोळ्यांचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत, ...
साताºयात चोºया करणारी टोळी गजाआड
ठळक मुद्देरेकॉर्डवरील काही गुन्हेगार सातारा शहर व परिसरात दिवसा आणि रात्री घरफोडी करतया टोळीने चोरलेले दागिने कोल्हापूरमधील सराफ व्यावसायिक महेश झोपडेकर याला विकल्याचेएक चेन, एक मंगळसूत्र, दोन पाटल्या, सहा बांगड्या, एक सोन्याची लगड असा तेरा तोळ्यांचा ऐवज