शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सात जिल्ह्यांतून वाहने चोरणारी टोळी गजाआड

By admin | Updated: January 18, 2017 00:00 IST

वीस वाहने केली स्क्रॅप : सर्वजण माण तालुक्यातील

सातारा : सातारा, सांगली, सोलापूर, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडसह विविध जिल्ह्यांतून चारचाकी वाहने चोरणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केली असून, त्यांनी १३ डंपर, १ ट्रक, १ टँकर, २ ट्रॅक्टर, तसेच ट्रॅक्टर ट्रॉली, विहिरीवरील क्रेन चोरल्याची कबुली दिली आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.सुभाष गंगाराम सावंत, विजय पाटोळे, हणमंत भगवान पाटोळे, सागर शंकर चव्हाण (सर्व रा. दिवडी, ता. माण) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.सुभाष सावंत हा त्याच्या साथीदारासह सातारा तसेच इतर जिल्ह्यांतही चारचाकी वाहने चोरी करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांना मिळाली. त्यानुसार ‘एलसीबी’च्या टीमने त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवले. सुभाषचा साथीदार विजय पाटोळेने वडूज शहरातून एक दुचाकी चोरली होती. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर या टोळीचा छडा लागला. परजिल्ह्यांतून वाहने चोरून आणल्यानंतर ही टोळी सर्व वाहने स्क्रॅप करत होती. तसेच कऱ्हाडमधील अनिस रशीद चौधरी याच्यामार्फत कोल्हापूर येथील अन्वर दाऊद कच्छी व परवेझ सदाम पटेल यांना विकत होते. या तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.एक ट्रॅक्टर, ट्रॉली, पाण्याचा टँकर, एक डंपरचे स्पेअर पार्ट असा एकूण १५ लाख ५० हजारांचा ऐवज या टोळीकडून जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमध्ये जीवन माने, पोलिस उपनिरीक्षक रमेश गर्जे, प्रसन्न जऱ्हाड, सहायक फौजदार सुरेंद्र पानसांडे, हवालदार उत्तम दबडे, मोहन घोरपडे, तानाजी माने, विजय कांबळे, शरद बेबले, मुबीन मुलाणी, रामचंद्र गुरव, रवी वाघमारे, रूपेश कारंडे, मारुती लाटणे, नितीन गोगावले, संजय जाधव, विजय सावंत, संजय वाघ, मारुती अडागळे यांनी सहभाग घेतला. (प्रतिनिधी)खुनातील आरोपीस अटकआटुगडेवाडी, कोकरुड, जि. सांगली येथील बाळू विठ्ठल शिंदे यांच्या घरामध्ये ३० आॅक्टोबर २०१६ रोजी दरोडा पडला होता. यावेळी संशयित आरोपी प्रवीण ऊर्फ परव्या राजा शिंदे (रा. गोपूज, ता. खटाव) याच्यासह त्याच्या साथीदारांनी सशस्त्र दरोडा टाकून त्यांना गंभीर जखमी केले होते. याशिवाय दहिवडी, उंब्रज, वडूज, पुसेगाव, वडगाव निंबळक, चिंचणी वांगी या परिसरातही अनेकांना लूटमार करून गंभीर जखमी केले होते. खटाव येथून त्याला पोलिसांनी अटक केली. त्याने ३७ गुन्ह्यांची कबुली दिली.