शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

मालकीच्या वादात सापडले गणेशमंदिर

By admin | Updated: July 3, 2015 01:19 IST

पोलिसांकडून टाळे : तीन गावांचा बसेना मेळ

अजित जाधव- महाबळेश्वर -महाबळेश्वर : माचुतर येथील गणेश मंदिराच्या मालकीवर शिंदोळा व भेकवली या तीन गावांनी हक्क सांगितल्याने हे मंदिर वादात सापडले आहे. तीन गावच्या बैठकीत एकमत न झाल्याने अखेर पोलिसांनी या मंदिराला टाळे टोकल्याने गणेशभक्ताची व पर्यटकाची माठी गैरसोय होत आहे. महाबळेश्वरपासून सहा किलोमीटर अंतरावर मेढा रस्त्यावर हे मंदिर आहे. हे मंदिर तीन गावांच्या हद्दीवर आहे. मंदिराची जागा वनविभागाची आहे. एका धनिकाने या मंदिराची दुरूस्ती करून सुशोभीकरण केले. दैनंदिन पुजेसाठी तेथे एका पुजाऱ्याची व्यवस्था केली. तसेच दानपेटी बसविण्यात आली आहे. दानपेटीतून जमा होणाऱ्या रकमेतून दैनंदिन खर्च व पुजारी याचा खर्च करण्याची जबाबदारी येथील एका व्यक्तीवर सोपविण्यात आली आहे. गेली काही वर्षे ही व्यवस्था विनबोभाटपणे सुरू होती. अलीकडील काही वर्षात हे मंदिर शहरातील गणेशभक्तांचे तसेच पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे. महाबळेश्वर दर्शन फेरीमध्ये या मंदिराचा समावेश करण्यात आल्याने मोठ्या प्रमाणावर येथे पर्यटक भेट देतात. त्यामुळे दानपेटीत चांगली रक्कम मिळूू लागली आहे. नेमकी ही बाब भेकवली ग्रामस्थांच्या लक्षात आली व प्रथम या मंदिराच्या मालकीवर हक्क सांगितला. ३ जून रोजी गणेश मंदिरातील दानपेटी उचलून गावात नेली. तेथे ग्रामस्थांच्या समोर पेटीतील रक्कम गावाकडे जमा करण्यात आली.प्रत्येक गाव हे मंदिर आमचे असल्याचे सांगत आहे, त्यामुळे वाद मिटण्याऐवजी चिघळत चाललेला आहे. दरम्यान, या वादावर तोडगा काढण्यासाठी दोन दिवसांपूर्वी तहसीलदार अतुल म्हेत्रे याच्या उपस्थितीत तीन गावच्या प्रमुखाची बैठक पार पडली. या बैठकीला पोलीस निरीक्षक प्रकाश सावंत, वनक्षेत्रपाल एस. डी. कुलकर्णी, गटविकास अधिकारी जी. पी. शिंदे, दोन माजी नगराध्यक्ष किसन शिंदे व बबन ढेबे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.या बैठकीत तीन गावांकडून वेगवेगळे प्रस्ताव येत होते. एका गावच्या प्रस्तावाला इतर गावची मडळी विरोध करत होती. त्यामुळे बैठकीतून तोडगा निघत नव्हता. तीन गावांचा समावेश करून मंदिराचा ट्रस्ट स्थापन करण्याबाबतही काहींनी सूचना केली; परंतु भेकवली ग्रामस्थ याला विरोध करीत होते. शेवटी तीन गावांचा वाद मिटवावा, तोवर या मंदिराला पोलिसांनी टाळे ठोकण्याचा निर्णय घेण्यात आला. रोज सकाळी पूजा झाल्यानंतर या मंदिराला टाळे ठोकले जातात. गले तीन दिवस या मंदिराला टाळा असल्याने भाविकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दानपेटी पळविल्याने संतापभेकवली ग्रामस्थांनी दानपेटी नेल्याची खबर शिंदोळा व माचुतर ग्रमस्थांना समजताच या दोन्ही गावांत संतापाची लाट उसळली. माचुतर गावात काही प्रमुख मंडळी एकत्र आले व त्यानी या मंदिराला टाळे ठोकले व भेकवली ग्रामस्थांविरूध्द दानपेटी चोरी करण्याची तक्रार महाबळेश्वर पोलिसात दिली. पोलिसानी तक्रार अर्ज घेतला; परंतु कोणावरही गुन्हा दाखल केला नाही. मात्र मंदिराला ठोकलेले टाळे काढले तेव्हापासून या मंदिराचा वाद येथे सुरू झाला आहे. दरम्यान, २४ जून रोजी पुन्हा भेकवली ग्रामस्थानी दानपेटी उघडली व पुन्हा जोरदार वाद सुरू झाला.