शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

खेळ असा रंगला गं, खेळणारा दंगला!

By admin | Updated: October 18, 2015 23:33 IST

पारंपरिक पोशाखात नृत्य : ‘राजधानी रास दांडिया’त नातीपासून आजीपर्यंत सर्वांनीच धरला ठेका-- लोकमत माध्यम प्रायोजक

सातारा : आवरून सावरून असलेल्या महिलांचा जत्था.. सर्वोत्कृष्ठ ठरण्याची तयारी, थिरकायला लावणारे संगीत आणि प्रोत्साहन द्यायला उपस्थित महिलांची गर्दी... अशा वातावरणात शनिवारी ‘राजधानी रास दांडिया रंगला’ चार वर्षांपासून तब्बल ६० वर्षांच्या आजीपर्यंत सर्वांनीच दांडियाचा मनसोक्त आनंद घेतला.येथील अनंत इंग्लिश स्कूलमध्ये शनिवारपासून ‘राजधानी रास दांडिया’चे आयोजन करण्यात आले आहे. ‘लोकमत’ या कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक आहे. मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर उपस्थित महिलांनी सुमारे दहा मिनिटे विविध गाण्यांवर मनसोक्त नृत्य करण्याचा आनंद घेतला. त्यानंतर गोल करून महिलांनी उडत्या चालीवरील गाण्यावर ‘रास दांडिया’ खेळला. ‘साडी की फॉल से, नगारे संग ढोल बाजे, धतिंग डान्स, दिल्ली वाली गर्लफ्रेंड, नागीन डान्स चायना, सेल्फी ले ले... कुडी सॅटरडे ’ या सारख्या अनेक उडत्या चालींच्या गाण्यावर महिलांनी लयबद्ध नृत्य सादर केले.नवरात्रोत्सवात युवतींना दांडियासाठी बाहेर पाठवताना अनेक पालक चिंतातुर असतात; मात्र येथे हे चित्र पाहायला मिळाले नाही. रोज एकीला ‘दांडिया क्विन आॅफ द डे’ म्हणून निवडण्यात येणार आहे. तीन दिवसांच्या क्विनमधून चौथ्या दिवशी ‘राजधानी क्विन’साठी सामना रंगणार आहे. चार दिवसांची उपस्थिती बंधनकारक आहे. दररोज एका भाग्यवान विजेतीला बक्षिस आहे. राजधानी क्विनला पुढील वर्षी मानाचे स्थान, समितीमध्येही सहभागी करुन घेतले जाणार आहे. (प्रतिनिधी) अपघात विमाया ‘रास दांडिया’साठी उपस्थित असणाऱ्या कोणाचाही अपघाती मृत्यू झाला तर त्यांच्यासाठी दोन लाखांचा अपघात विमा उतरविण्यात आला असल्याची माहिती मुख्य संयोजक सिद्धी पवार यांनी दिली.‘नो मॅन झोनरास दांडिया’ खास महिलांसाठी असल्यामुळे येथे ‘नो मॅन झोन’ दिसत होते. बोटावर मोजता येतील एवढेच पुरुष लांब कुठेतरी घरातील चिमुकल्यांना खेळवत असल्याचे चित्र दिसत होते. तर आई-ताई बरोबर नृत्य बघायला आलेली अनेक लहान मुलं स्वत:चा गट करून खेळत बसले होते.