शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

गद्दारी केली म्हणून साथीदाराकडूनच गेम

By admin | Updated: February 12, 2017 22:28 IST

गुंड अभिजीत खून प्रकरण : राऊतवाडीतील एकास अटक; मद्यप्राशनानंतर केले कोयत्याने वार

कऱ्हाड : साताऱ्यातील तडीपार गुंडाच्या खुनात पोलिसांनी त्याच्याच एका साथीदाराला ताब्यात घेऊन अटक केली आहे. गुन्ह्यातील सहभागाची पोलिसांना माहिती देऊन तुरुंगात अडकवलं व चोरीच्या मुद्देमालात योग्य वाटणी दिली नाही, या कारणावरून आपण हा ‘गेम’ केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली आहे. साताऱ्याच्या स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही तासांत या खुनाचा उलगडा करून आरोपीला गजाआड केले. अमोल बाबूराव पोळ (वय २८, रा. राऊतवाडी, ता. कोरेगाव) असे पोलिसांनी अटक केलेल्याचे नाव आहे. शहरानजीक बनवडी येथे अभिजित ऊर्फ नान्या तुळशीदास पवार (वय ३५, मूळ रा. लिंब, ता. सातारा) याचा शुक्रवारी रात्री धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला होता. अभिजित ऊर्फ नान्या हा सातारा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार होता. त्याच्यावर चोरी, जबरी चोरी, घरफोडी, दरोड्याची तयारी असून, तब्बल ४७ गुन्हे नोंद होते. काही दिवसांपूर्वीच त्याला साताऱ्यातून तडीपार करण्यात आले होते. तडीपार केल्यानंतर तो कऱ्हाडनजीक बनवडी येथील जलविहार कॉलनीत वास्तव्यास आला. त्याठिकाणी त्याने एक फ्लॅट भाडेतत्त्वावर घेतला. राहण्यास आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याने दारूच्या नशेत पत्नीला मारहाण केल्यामुळे पत्नी माहेरी निघून गेली. त्यामुळे नान्या एकटाच त्या फ्लॅटमध्ये वास्तव्य करीत होता. दरम्यान, शनिवारी दुपारी इमारतीचा सुरक्षारक्षक आधारकार्डची झेरॉक्स आणण्यासाठी गेला असताना नान्याचा खून झाल्याचे उघडकीस आले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस उपअधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर, निरीक्षक प्रमोद जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी त्याठिकाणी दाखल झाले. अभिजित ऊर्फ नान्या हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याने त्याचा दुसऱ्या एखाद्या गुन्हेगाराने खून केल्याची शक्यता होती. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला. त्यातच नान्याचा साथीदार अमोल पोळ याची माहिती पोलिसांना मिळाली. अमोल पोळ व नान्या या दोघांनी एकत्रितपणे दहापेक्षा जास्त गुन्हे केले आहेत. त्यामुळे पोलिसांचा पोळवरील संशय बळावला. गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक रमेश गर्जे व त्यांच्या पथकाने तातडीने पोळचा शोध सुरू केला. शनिवारी रात्रीच त्याला साताऱ्यातून ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्याला कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात आणून त्याच्याकडे कसून चौकशी करण्यात आली. त्यावेळी त्याने या गुन्ह्याची कबुली दिली. नान्या व अमोल पोळने यापूर्वी जे गुन्हे केले होते, त्या गुन्ह्यात चोरून आणलेल्या ऐवजातील योग्य वाटणी नान्याने अमोलला दिली नव्हती. या गद्दारीमुळे त्याचा त्याच्यावर राग होता. तसेच यापूर्वी एका चोरीच्या गुन्ह्यात नान्याला अटक झाली होती. त्यावेळी पोलिस तपासात नान्याने अमोलचे नाव घेतले. त्यामुळे अमोललाही अटक झाली. नान्यामुळेच आपल्याला तुरुंगात जावे लागले. तसेच त्याने जामिनासाठीही आपल्याला मदत केली नाही, याचाही राग अमोलच्या डोक्यात होता. याच रागातून त्याने शुक्रवारी रात्री शस्त्राने वार करून नान्याचा खून केल्याची माहिती पोलिस तपासात उघड झाली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने आरोपी अमोल पोळ याला कऱ्हाड शहर पोलिसांच्या ताब्यात दिली असून, कऱ्हाड पोलिसांनी त्याला अटक केली आहे.