शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

धनगर समाजाचे गजीनृत्य आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 23:01 IST

कºहाड : आरक्षणाच्या मागणीची अंमलबजावणी करावी, मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन पाळावे, धनगर समाजाला राज्यघटनेनुसार अनुसूचित जमातीच्या सवलती सुरू कराव्यात, धनगड ऐवजी धनगर असा उल्लेख करावा, आदी मागण्यांसाठी धनगर आरक्षण कृती समितीच्या वतीने मंगळवारी येथील तहसील कार्यालयावर गजीनृत्य करत मोर्चा काढण्यात आला.यावेळी समाजबांधवांच्या वतीने तहसीलदार राजेंद्र शेळके यांना मागण्यांचे निवेदन दिले. आक्रमक ...

कºहाड : आरक्षणाच्या मागणीची अंमलबजावणी करावी, मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन पाळावे, धनगर समाजाला राज्यघटनेनुसार अनुसूचित जमातीच्या सवलती सुरू कराव्यात, धनगड ऐवजी धनगर असा उल्लेख करावा, आदी मागण्यांसाठी धनगर आरक्षण कृती समितीच्या वतीने मंगळवारी येथील तहसील कार्यालयावर गजीनृत्य करत मोर्चा काढण्यात आला.यावेळी समाजबांधवांच्या वतीने तहसीलदार राजेंद्र शेळके यांना मागण्यांचे निवेदन दिले. आक्रमक झालेल्या धनगर समाजबांधवांनी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व भाजपवर हल्लाबोल करीत येथील कोल्हापूर नाक्यापासून दत्त चौकमार्गे तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात ‘एक धनगर कोट धनगर, कोण म्हणतंय देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही, आरक्षण आमच्या हक्काचं, येळकोट येळकोट जय मल्हार, धनगड दाखवा नाहीतर शिफारस पाठवा, एसटी आरक्षण मिळालेच पाहिजे,’ अशा गगनभेदी घोषणा देत मंगळवारी धनगर समाजबांधवांनी कºहाडात मोर्चा काढला. मोर्चामध्ये मोठ्या संख्येने धनगर समाजबांधव व महिलाही सहभागी झाल्या होत्या.धनगर ऐवजी धनगड जात निर्माण करून केंद्रशासनाला खोटी माहिती दिल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेसचा तर बारामती येथे धनगर समाज बांधवांनी जेव्हा मोर्चा काढला तेव्हा आम्ही सत्तेवर आल्यावर पहिल्या बैठकीत आरक्षणाचा प्रश्न निकाली लावू म्हणणारे मुख्यमंत्री फडणवीस यांनी आश्वासन न पाळल्याबद्दल त्यांचाही तीव्र निषेध समाजबांधवांनी नोंदविला.यावेळी धनगर समाजबांधव येथील कोल्हापूर नाक्यापासून दत्तचौक याठिकाणी आले. येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास अभिवादन केले. या ठिकाणी समाजबांधवांनी गजीनृत्य केले. त्यानंतर पुन्हा समाजबांधव तालुका पोलीस स्टेशनमार्गे भेदा चौकातून तहसील कार्यालय येथे गेले.यावेळी आॅल इंडिया धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे, शिवाजीराव गावडे, रमेश लवटे, भाऊसाहेब देवे, नितीन पुकळे, जयश्री लाडे, मंगल गलांडे, भगवान येडगे, आबासाहेब गावडे, रामझोरे, विलास पोळ, तेजस्विनीमेटकरी आदींची प्रमुख उपस्थिती होती.येळकोट येळकोट जय मल्हार.....कºहाड येथे आरक्षण मागणीसाठी काढलेल्या मोर्चाच धनगर समाजातील काही समाजबांधव त्यांच्या मूळच्या पारंपरिक वेशात सहभागी झाले होते. कपाळाला भंडारा लावून येळकोट येळकोट जय मल्हार... असा जयघोष करीत शहरातून समाजबांधवांनी ढोल वाजवत व गजीनृत्य करीत कोल्हापूर नाक्यापासून मोर्चास सुरुवात केली.७२ वर्षांपासूनप्रलंबित प्रश्न...डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेत धनगर समाजाला आरक्षण दिले आहे. फक्त त्याची अंमलबजावणी राज्य सरकारने करणे आवश्यक आहे. ही मागणी गेली ७२ वर्षांपासून समाजाची आहे. या मागणीसाठी मंगळवारी धनगर समाजबांधवांनी कºहाडात गजीनृत्य करीत मोर्चा काढला.