शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

‘कऱ्हाड दक्षिण’साठी गडकरी-भोसले चर्चा

By admin | Updated: March 30, 2016 00:11 IST

निधीची मागणी : महत्त्वाकांक्षी कामांची यादीकडे लक्ष वेधले; विकासासाठी घातले साकडे

कऱ्हाड : कराड दक्षिण मतदारसंघातील कऱ्हाड शहरासाठी नवीन बायपास रस्ता तसेच संगम हॉटेलसमोरील उड्डाणपूल व राष्ट्रीय महामार्गावरील मालखेड येथील कृष्णा नदीवरील पुलासह वाठार, रेठरे बुद्रुक ते शेणोली स्टेशन, तासगाव जोडणाऱ्या दुभाजकासह रस्ता यासारख्या महत्त्वाकांक्षी विकासकामांच्या निधीला मंजुरी द्यावी, अशी मागणी भाजपचे प्रदेश चिटणीस डॉ. अतुल भोसले यांनी केंद्रीय रस्तेवाहतूक व जहाजमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.कऱ्हाड येथे कृष्णा अभिमत विद्यापीठाच्या पदवीदान समारंभासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आले होते. प्रारंभी विमानतळावर डॉ. अतुल भोसले यांनी भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत गडकरी यांचे स्वागत केले. यावेळी डॉ. अतुल भोसले यांनी दक्षिणच्या विकासासाठी महत्त्वाची असणारी विकासकामे व त्यासाठी लागणाऱ्या निधीसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निवेदन सादर केले.यामध्ये राष्ट्रीय महामार्गावर गोटे ते कऱ्हाडातील सात शहीद चौक हा रस्ता, कृष्णा नदीवरील पुलासह तयार करून मजबुतीकरण व डांबरीकरण तसेच राज्य मार्ग क्र. १४४ कऱ्हाड-मलकापूर नांदलापूर, येणपे, कोकरूड हा २७ कि.मी. रस्ता, राज्य मार्ग क्र. १४८ मधील नवजा-हेळवाक, मोरगिरी, साजूर, तांबवे, विंग, वाठार, रेठरे बुद्रुक, शेणोली स्टेशन हर १०५ कि. मी. पैकी राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वाठार ते शेणोली स्टेशनपर्यंत दुभाजकासह मजबुतीकरण व डांबरीकरण, ७.५ कि. मी. रस्ता, उंब्रज, इंदोली ते पाल १३ कि.मी. रस्ता, कालवडे, बेलवडे बद्र्रुक, कासारशिरंबे, साळशिरंबे १५ कि. मी. रस्ता, पाचवडेश्वर ते कोडोली, कृष्णा नदीवरील पूल बांधकामांसह दुशेरे ते शेरे ते शेणोली स्टेशनपर्यंत १७ कि. मी. रस्ता, कऱ्हाड-कापील, कोडोलीपर्यंतचा ४ कि. मी. रस्ता, नारायणवाडी ते कालेटेक, काले, कालवडे, नांदगाव, साळशिरंबे, पाचुंब्रीपर्यंतचा २७ कि. मी. रस्ता, कार्वे, कोडोली, शेरे गोंदी ते रेठरे बुद्रुक १६ कि. मी.रस्ता, वहागाव, घोणशी ते कोपर्डे हवेली, पार्ले बनवडी ८.५ कि. मी. रस्ता, येणके, आणे, कोळे पर्यंतचा ६ कि. मी. रस्ता, उंडाळे, शेवाळेवाडी, पाटीलवाडी ते रयत कारखाना, येळगाव, शेवाळेवाडी ते येणपे गिरजवाडी १४ कि. मी. रस्ता, आटके, नारायणवाडी ते कालेटेक, कालवडे, नांदगाव, साळशिरंबे, पाचुंब्री रस्त्यास निधी मिळणेबाबतचे निवेदन केंद्रीय रस्तेविकास मंत्री नितीन गडकरी यांना देण्यात आले. यावेळी गडकरी यांनी कराड दक्षिणमधील विकासकामांसाठी लागणाऱ्या निधीसंदर्भात सकारात्मक निर्णय घेणार असल्याची ग्वाही डॉ. भोसले यांना दिली.(प्रतिनिधी)