शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

उंडाळकर गडकरींच्या तर गडकरी राजाभाऊंच्या भेटीला!

By admin | Updated: March 27, 2016 23:59 IST

भाजपच्या इतर नेत्यांबरोबरच ज्येष्ठ नेते राजाभाऊ देशपांडे यांनीही त्यांचे स्वागत केले. त्यानंतर गडकरी कार्यक्रमस्थळी रवाना झाले.

कऱ्हाड : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी शनिवारी कऱ्हाड दौऱ्यावर असताना भाजपचे ज्येष्ठ नेते राजाभाऊ देशपांडे यांच्या भेटीला त्यांच्या निवासस्थानी पोहोचले; पण राजाभाऊ देशपांडे बाहेर गेल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही. दरम्यान, माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांनीही विमानतळावर गडकरींची भेट घेतली. पाचवडेश्वर-कोडोली दरम्यान पुलासाठी २४ कोटी निधीला मंजुरी मिळावी, अशी मागणी उंडाळकरांनी केली. कृष्णा अभिमत विद्यापीठाच्या पदवीदान समारंभासाठी केंद्रीय मंत्री गडकरी आले होते. सकाळी साडेनऊ वाजता कऱ्हाड विमानतळावर त्यांचे आगमन झाले. त्यावेळी भाजपच्या इतर नेत्यांबरोबरच ज्येष्ठ नेते राजाभाऊ देशपांडे यांनीही त्यांचे स्वागत केले. त्यानंतर गडकरी कार्यक्रमस्थळी रवाना झाले. तर राजाभाऊ देशपांडे त्यांच्या कामानिमित्त कोळे येथे निघून गेले.दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास गडकरी यांचा नियोजित कार्यक्रम संपला. आता ते विमानतळावरून सोलापूरला रवाना होणार होते. त्यामुळे पोलिस बंदोबस्त तसा लागला. मात्र, गाडीत बसल्यावर त्यांनी राजाभाऊ देशपांडे यांच्या घरी जायचे असल्याचे सांगितले. त्यामुळे प्रशासनाची धावपळ उडाली. गाड्यांचा ताफा देशपांडे यांच्या घरी पोहोचला. नीतिश देशपांडे, शांता देशपांडे यांनी त्यांची स्वागत केले. चहापान घेऊन गडकरींनी देशपांडे परिवाराचा निरोप घेतला. मात्र, गडकरींच्या सदिच्छा भेटीने देशपांडे परिवाराच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता.दरम्यान, विमानतळावर उंडाळकरांनी गडकरींची भेट घेतली. २४ कोटींच्या निधींच्या मंजुरीची मागणी त्यांनी केली. या मागणीचा गांभीर्याने विचार करत केंद्रीय मंत्री गडकरी यांनी तातडीने निधी देण्याचे आश्वासन दिले. कऱ्हाड दक्षिण मतदारसंघातील पुणे-बंगलोर महामार्ग-पाचवडेश्वर कोडोली-दुशेरे ते शेणोली स्टेशन या प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक ६५ वरील पुलासाठीचा प्रस्ताव केंद्रीय मार्ग निधी योजना २०१५ अंतर्गत सार्वजनिक बांधकाम मंडल, सातारा यांच्याकडून पाठविण्यात आला होता. (प्रतिनिधी)