शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
4
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
5
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
6
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
7
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
8
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
9
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
10
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
11
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
12
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
13
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
14
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
15
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
16
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
17
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
18
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
19
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
20
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला

हागणदारीमुक्तीसाठी ‘गडहिंग्लज’ची धडपड

By admin | Updated: November 15, 2015 23:50 IST

नगरपालिका प्रयत्नशील : शासनाकडून १५ लाखांचा निधी; ५२ कुटुंबांना हवी आहे सुविधा; फिरती शौचालयेही देणार

राम मगदूम-- गडहिंग्लज --केवळ जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात विविध शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात आघाडीवर असणारी ‘गडहिंग्लज नगरपालिका’ हागणदारीमुक्त शहराच्या संकल्पपूर्तीसाठी धडपडत आहे. उघड्यावर शौचास जाणाऱ्या केवळ ५२ कुटुंबांना शौचालयाची सुविधा पुरविल्यानंतर गडहिंग्लज हागणदारीमुक्त होणार आहे. त्यासाठी नगरपालिका युद्ध पातळीवर प्रयत्नशील आहे.केंद्राच्या ‘स्वच्छ भारत अभियाना’च्या धर्तीवर राज्यातही ‘स्वच्छ महाराष्ट्र अभियान’ राबविण्याचा निर्णय राज्याने घेतला आहे. या अभियानांतर्गत राज्यातील सर्व खेडी आणि शहरे हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प शासनाने सोडला आहे. त्याच्या पूर्ततेसाठी राज्यभर धडक मोहीम सुरू आहे. उत्स्फूर्तपणे शहर हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प तडीस नेलेल्या राज्यातील १९ नगरपालिकांचे नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विशेष सन्मान करून शासनाने या मोहिमेस गती दिली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरविलेल्या मुख्याधिकाऱ्यांमध्ये गडहिंग्लज तालुक्यातील महागावचे सुपुत्र राजेंद्र तेली (मलकापूर) व प्रकाश पाटील (रोहा) आणि सावतवाडी तर्फ नेसरीचे सुपुत्र प्रसाद शिंगटे (गुहागर) यांचा समावेश आहे. त्यांच्यापाठोपाठ हागणदारीमुक्त शहरांच्या पंक्तीत जाऊन बसण्याची धडपड येथील मुख्याधिकारी, नगरसेवक, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चालविली आहे.२०११ च्या जनगणनेनुसार उघड्यावर शौचास जाणाऱ्या कुटुंबांची संख्या गडहिंग्लजमध्ये ११६ आहे. वैयक्तिक शौचालय नसणाऱ्या ८९२ कुटुंबांसाठी नगरपालिकेने २९८ सार्वजनिक शौचालये बांधली आहेत. त्याचबरोबर विविध शासकीय योजनेतून घरकुल बांधलेल्या ८२ लाभार्थ्यांनी वैयक्तिक शौचालयदेखील बांधली आहेत. गांधीनगरातील गांधीनगर हौसिंग सोसायटी व नगरपालिकेच्या जागेत अतिक्रमण करून झोपड्या बांधलेल्या ३९ इराणी कुटुंबांना शौचालय सुविधा उपलब्ध करण्याचे आव्हान होते. मात्र, पुनर्वसन होईपर्यंत त्यांना फिरते शौचालय उपलब्ध करून देण्याचा निर्णय पालिकेने नुकताच घेतला आहे. त्यामुळे हागणदारीमुक्तीचा मार्ग सोपा झाला आहे.गडहिंग्लज पालिकेला स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत शासनाकडून १५ लाख रुपये शौचालय अनुदान मिळाले आहे. यातून वैयक्तिक शौचालय नसणाऱ्या ११६ पैकी पात्र २५ कुटुंबांना शौचालय अनुदान मंजूर करण्यात आले आहे. उर्वरित ५२ कुटुंबांनाही शौचालय सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याची पूर्तता होताच गडहिंग्लज ‘हागणदारीमुक्त’ होणार आहे.उघड्यावर शौचास जाणाऱ्या ३९ इराणी कुटुंबांसाठी फिरते शौचालय सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. २५ कुटुंबांना शौचालय अनुदान मंजूर झाले असून, उर्वरित ५२ कुटुंबांना शौचालय सुविधा उपलब्ध करण्यासाठी पालिका प्रयत्नशील आहे. गडहिंग्लज हागणदारीमुक्त करण्यात लवकरच यश येईल. - राजेश बोरगावे, नगराध्यक्ष, गडहिंग्लज.हागणदारीमुक्तीसाठी वैयक्तिक शौचालय बांधणाऱ्यांना केंद्रातर्फे चार हजार, तर राज्यातर्फे आठ हजार असे एकूण १२ हजारांचे अनुदान मिळते. त्यात पालिकेनेही स्वत:ची पाच हजारांची भर घातली असून, पात्र लाभार्थ्यांना प्रत्येकी एकूण १७ हजारांचे अनुदान देण्यात येत आहे.