शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

साताऱ्यात दिग्गजांचे भविष्य आज मशीनबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2019 11:17 PM

 सातारा । जिल्ह्यातील फलटण, वाई, कोरेगाव, माण, कºहाड उत्तर, कºहाड दक्षिण, पाटण, सातारा या आठ विधानसभा मतदारसंघांसाठी आज (सोमवारी) ...

 सातारा । जिल्ह्यातील फलटण, वाई, कोरेगाव, माण, कºहाड उत्तर, कºहाड दक्षिण, पाटण, सातारा या आठ विधानसभा मतदारसंघांसाठी आज (सोमवारी) मतदान प्रक्रिया राबविली जाणार आहे. या निवडणुकीत २0१४ मध्ये निवडून आलेल्या आठ आमदारांसह ७३ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. राष्ट्रवादी-काँगे्रस व मित्र पक्षांची महाआघाडी विरुद्ध भाजप-शिवसेना व मित्र पक्षांची महायुती अशा प्रमुख लढती होणार असल्या तरी वंचित बहुजन आघाडीनेही प्रत्येक मतदारसंघात उमेदवार उभे केले असल्याने आघाडी व महायुतीच्या उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. माण, कºहाड उत्तर व कºहाड दक्षिण या मतदारसंघांमध्ये अपक्षांनीही मोठे आव्हान उभे केले आहे. सकाळी ७ वाजता होणार असून, ६ वाजता मतदान पूर्ण होईल.कडेकोट बंदोबस्त३,७00 स्थानिक पोलीस, १२00 होमगार्डस्,केंद्रीय तसेच राज्य राखीव दलाच्या ५ तुकड्या, पुणे, सांगली, कोल्हापूर तसेच कर्नाटकवरून अतिरिक्त पोलीस बळ साताºयातील पोलिसांच्या मदतीला आले आहेत. ठिकठिकाणी नाकाबंदी सुरू आहे.कशी मिळवू शकतामतदान केंद्राची माहिती?मतदारांना एका क्लिकवर मतदान केंद्र व मतदार यादीतील त्यांची माहिती मिळविण्याची सुविधा आयोगाच्या ँ३३स्र२://ी’ीू३ङ्म१ं’२ीं१ूँ.्रल्ल/या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.या संकेतस्थळावर स्वत:ची संपूर्ण माहिती नमूद केल्यास माहितीचा शोध घेता येतो. माहिती भरताना नाव, वडील/पतीचे नाव, वय अथवा जन्मतारीख, लिंग, राज्य, जिल्हा, विधानसभा मतदारसंघ या बाबींचा समावेश करावा. मतदार ओळख क्रमांक व राज्याचे नाव टाकल्यानंतर मतदारांची माहिती मिळविण्याची दुसरी सुविधाही या संकेतस्थळावर आहे.मतदारांसाठी ३९६३ व्हीव्हीपॅटविधानसभा निवडणुकीत पारदर्शी मतदान व्हावे, यासाठी प्रथमच तीन हजार ९६३ व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरीफायबल पेपर आॅडिट्रेल) यंत्रांचा वापर केला जाणार आहे. यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. मतदान केल्यानंतर सात सेकंदामध्ये मतदाराला पावती मिळेल. त्यावर निवडणूक चिन्ह, नाव व उमेदवाराचा मतपत्रिकेतील अनुक्रमांक नमूद असेल. या पावतीमुळे मतदाराने दिलेल्या मताची खात्री करणे शक्य आहे.कुठे काही गडबड झाली तर काय ?शहरातील कोणत्याही भागात मतदानाच्या वेळी कसलीही गडबड झाली किंवा कुठे कायदा व सुव्यवस्थेची स्थिती निर्माण झाली तर अवघ्या ५ ते ७ मिनिटांत शीघ्र कृती दल (क्यूआरटी) तेथे पोहोचेल. कोणत्याही स्थितीचा सामना करण्यासाठी केंद्रीय राखीव पोलीस दल आणि राज्य राखीव पोलीस दल तत्काळ धाव घेऊन कारवाई करणार आहेत. सोमवारी सकाळपासून मतदान संपेपर्यंत पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय अधिकारी हे स्वत: बंदोबस्ताची जबाबदारी सांभाळणार आहेत.ईव्हीएम बिघडल्यास काय आहे व्यवस्था ?ईव्हीएम मशीन बिघडण्याची शक्यता लक्षात घेता आधीपासूनच अतिरिक्त मशीन उपलब्ध करण्यात आल्या आहेत. यामध्ये ९८५ व्हीव्हीपॅट, ७४५ कंट्रोल युनिट तर ७७९ बॅलेट युनिट अतिरिक्त उपलब्ध आहेत. सेक्टर आॅफिसरच्या गाडीमध्ये हे यंत्र सुरक्षित राहतील.