शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

प्रश्नावलीतून उलघडले गुन्हेगारांचे फंडे!

By admin | Updated: July 6, 2015 00:24 IST

पोलिसांकडून जनजागृती : फसवणुकीच्या प्रकाराची महिलांना दिली माहिती

सातारा : अनेक वर्षांपासून शहरात सोनसाखळी चोरीचे प्रकार तसेच विविध आमिषे दाखवून महिलांना हातोहात फसविले जात आहे. रोज या घटना घडत असल्याने पोलीस अक्षरश: हतबल झाले आहेत. चोरट्यांना पकडल्यानंतर पुन्हा त्यांना जामीन मिळाल्यानंतर चोरीचे प्रकार वाढतच आहेत. गुन्हेगारांना जरब बसविण्यात कुठेही कसूर ठेवायचा नाहीच ; परंतु त्यापेक्षा महिलांमध्ये जनजागृती केल्यास सोनसाळखी किंवा फसवणुकीचे गुन्हे घडणारचं नाहीत. यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी अनोखी जनजागृती मोहीम राबवून महिलांना यामध्ये सामावून घेतले आणि गुन्हेगारांचे फंडे कसे असतात, याची माहिती पोहोचविण्याचे उदिष्ट्य साध्य केले.शहरात सोनसाखळी चोरीचे प्रकार दिवसेंदिवस वाढतच आहेत. सोनसाखळी चोरणारे किंवा विविध आमिषे दाखवून फसवणूक करणारे गजाआड होत आहेत. परंतु तरीही अशा घटना कमी होताना दिसत नाहीत. फसवणूक करणारे लोक शक्यतो महिलांना सावज बनवत असतात. यावर उपाय म्हणून पोलिसांनी अनोखी जनजागृती मोहीम राबवून चोरट्यांचे फंडे कसे असतात, याची प्रश्नावलीच्या माध्यमातून महिलांना माहिती दिली. एवढ्यावरच न थांबता ज्या महिलांनी सर्व प्रश्न सोडविले अशा महिलांना बक्षीसही देण्यात आले. या आगळ्या वेगळ्या गौरवाबरोबरच चोरट्यांच्या कार्यपद्धती कशा असतात, हे महिलांपर्यंत पोहोचविण्याचे उदिष्ट्य साध्य झाल्याने ९० टक्के गुन्हे या मोहीमेमुळे कमी होतील, असा विश्वास पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी व्यक्त केला.येथील पोलीस करमणूक केंद्रामध्ये महिला सुरक्षा जनजागृती प्रबोधन उपक्रमाचा बक्षिस वितरण साहेळा पार पडला. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, पोलीस निरीक्षक राजीव मुठाणे, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र यादव, हुंबरे, सहायक पोलीस निरीक्षक श्रीगणेश कानगुडे, हेरंब प्रतिष्ठानचे अध्यक्ष नाना इंदलकर, वाहतूक मित्र मधूकर शेंबडे, गुरूनाथ जाधव आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)काय आहे प्रश्नावली ?पहाटे फिरायला जाताना किंवा सायंकाळी चालताना महिलांनी दागिने परीधान करावेत का ?महिला व लहान मुलांना संकट समयी मदतीसाठी टोल फ्री कोणता ?आपले दागिने नेहमी कोठे ठेवावे ?बाहेर गावी जाताना घराला कोणत्या प्रकारचे कुलूप लावावे ?महिलांनी गाडीच्या डिकीमध्ये सोने किंवा मोठी रक्कम ठेवणे कितपत योग्य आहे ?तुमचे पॅनकार्ड नंबर, एटीएम नंबर सांगा. तुम्हाला बक्षिस लागले आहे. तुमचे गॅस अनुदान जमा करायचे आहे. अशी माहिती तुम्हाला फोनवर विचारल्यास तुम्ही काय कराल ?अनोळखी व्यक्तिच्या वाहनावर लिफ्ट द्यावी किंवा घ्यावी, हे योग्य आहे का ?