शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह््याच्या विकासासाठी खच्चून निधी आणणार

By admin | Updated: January 29, 2015 23:29 IST

विजय शिवतारे : २५० कोटींच्या आराखड्याची सदस्यांची मागणी

सातारा : ‘जिल्ह्याच्या विकासासाठी जो काही निधी लागेल, तो निधी राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून आणणार आहे. यात मी कुठेही कमी पडणार नाही. गेल्या वर्षी २२८ कोटींचा जिल्हा आराखडा मंजूर झाला होता. आताही २५० कोटींच्या वर जिल्ह्यासाठी निधी मिळावा, अशी मागणी बहुतांश नियोजन समितीच्या सदस्यांनी केली असून, जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी मी कटिबध्द आहे,’ अशी माहिती पालकमंत्री विजय शिवतारे यांनी पत्रकार परिषदेत दिली. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर आायोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. पालकमंत्री म्हणाले, ‘सातारा जिल्ह्यात विविध नावीन्यपूर्ण विकासकामे राबवायची आहेत. पहिल्याच बैठकीत नियोजन समितीच्या सर्व सदस्यांनी चांगले सहकार्य केले. जिल्ह्याच्या विकासासाठी विरोधकांनाही सोबत घेणार आहे. कुठल्या एका पक्षाचा पालकमंत्री नसतो, तर तो जिल्ह्याचा पालकमंत्री असतो, हे मी दाखवून देणार आहे. गेल्यावर्षी २२८ कोटींचा जिल्हा आराखडा होता. राज्यस्तरावरील बैठकांमध्ये यापेक्षा जादा निधी शासनाला मिळविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीसाठी राज्य शासनाने शंभर कोटींचा निधी मंजूर केला होता. त्यापैकी दहा कोटींचा निधी जिल्हा परिषदेच्या आॅडिटोरिअम हॉलसाठी लागणार आहे. या कामासाठी एकूण वीस कोटी रुपये लागणार असल्याने डीपीडीसीच्या नियमानुसार हा निधी देता येणार नसला तरी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून पाच कोटींचा निधी मिळविणार आहे. यासाठी आमदार, खासदारांना सोबत घेऊन बैठक घेणार आहे. दिवंगत बाळासाहेब देसाई यांच्या स्मारकासाठीही वाढीव निधी आणणार आहे.’खासदार उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नानुसार जिल्हा क्रीडा संकुलाच्या गुणवत्तेची थर्ड पार्टी तपासणी केली जाणार आहे. येथील बॅडमिंटन कोर्टची दुरवस्था झाली आहे. क्रीडासंकुल बांधल्यानंतर गॅरंटीच्या काळात ते खराब झाले असेल, तर संबंधित ठेकेदाराकडून त्याचे काम करून घेतले जाईल. मात्र, त्याआधी ४४ लाख रुपये खर्चून बॅडमिंटन कोर्टचे काम हाती घेण्यात येईल. टंचाईची बैठक येत्या पंधरा दिवसांत बोलावणार असून, डिपीडीसीच्या सर्व कामांची थर्ड पार्टी तपासणी केली जाणार आहे. नियमाच्या बाहेर जाऊन काम करणार नाही, असेही त्यांनी सांगितले.यानंतर पालकमंत्र्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. जिल्हा बँकेची निवडणूक येत्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या बैठकीत शिवसेनेचे धोरण काय असणार, या प्रश्नावर बोलताना पालकमंत्री म्हणाले, ‘जिल्ह्यातील प्रत्येक निवडणूक आम्ही लढविणार आहोत. सहकारामध्ये पक्षाचा विचारच येत नाही. समविचारी लोकांना सोबत घेऊन निवडणूक लढविणार आहोत. यातून कितपत यश मिळेल, हे मला माहीत नसले तरी सत्तेला चेक बसविण्याचे काम आम्ही करू.’ (प्रतिनिधी)