शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
3
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
4
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
5
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
6
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
7
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
8
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
9
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
10
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
11
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
12
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
13
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
14
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
15
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
16
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
17
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
18
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
19
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
20
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी

म्हसवेच्या ओसाड माळरानावर फुलणार फळं अन् फुलझाडं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 23:24 IST

सातारा : पुणे-सातारा महामार्गावरील सातारा पोलिसांच्या मालकीची ४० एकर जमीन अनेक वर्षांपासून पडीक होती. या ओसाड माळरानावर पोलीस व ...

सातारा : पुणे-सातारा महामार्गावरील सातारा पोलिसांच्या मालकीची ४० एकर जमीन अनेक वर्षांपासून पडीक होती. या ओसाड माळरानावर पोलीस व सामाजिक वनीकरण विभागाच्या प्रयत्नांमुळे १८ हजार झाडांची लागवड करण्यात आली. त्यामुळे आगामी काही वर्षांनंतर याच ओसाड माळरानावर आमराई फुलल्याचे चित्र पाहावयास मिळणार आहे.सातारा जिल्ह्याला ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. त्याचबरोबर पुरोगामी जिल्हा म्हणूनही ओळखला जात असल्याने अनेक नवनवीन उपक्रमांची सुरुवात साताऱ्यातून झाली आहे. त्यानंतर त्याचे अनुकरण राज्य तसेच देशाने केली आहे. सातारा पोलीस दलाच्या वतीने नवनवीन प्रयोग केले गेले आहेत. त्यात आणखी एका उपक्रमाची भर पडली आहे. सातारा शहरानजीक पोलीस दलाच्या मालकीची ४० एकर शेत जमीन आहे. ही शेत जमीन अनेक वर्षांपासून पडीक आहे. त्याचा वर्षातून केवळ एकदाच गोळीबाराचा सराव करण्यासाठी केला जातो. या जागेचा वापर करण्यासाठी प्रशासनाने वृक्षरोपण करण्याचा निर्णय घेतला. उन्हाळ्यात खड्डे खणले होते. पहिल्या पावसानंतर पोलीस व सामाजिक वनीकरण यांच्या माध्यमातून आंबा, चिंच, आवळा, सीताफळ या झाडांची लागवड केली आहे.सामाजिक वनीकरण जगविणार झाडेओसाड माळरानावर लागवड केलेल्या फळझाडे जगविण्याची संपूर्ण जबाबदारी सामाजिक वनीकरण विभागाने घेतली आहे. झाडे तीन वर्षांची झाल्यानंतर त्याचे संगोपनाची जबाबदारी पोलीस विभागाची राहणार आहे. त्याच्या फळ झाडांच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न पोलीस विभागाला मिळणार आहे. त्याचा वापर पोलीस कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी होऊ शकतो.