शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

आई-वडिलांसमोरच चिमुरड्याला स्कूल बसने चिरडले

By admin | Updated: September 5, 2015 23:26 IST

गोटेतील दुर्घटना : भावाला ‘बाय-बाय’ करताना काळाचा घाला

कऱ्हाड : आपल्या भावाला स्कूलबसपर्यंत सोडण्यासाठी आलेल्या दोन वर्षांच्या चिमुरड्याला आई, वडील व भावादेखत त्याच बसने चिरडले. ही दुर्घटना कऱ्हाडनजीक गोटे येथे शनिवारी सकाळी सव्वाआठच्या सुमारास घडली. रहिमान मोहसीन मुल्ला असे मृत बालकाचे नाव आहे. रहिमानचा डोळ्यादेखत मृत्यू झाल्याने त्याच्या कुटूंबियांनी आक्रोश केला. पोलीस व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, गोटे येथील दत्त कॉलनीत मोहसीन मुल्ला हे कुटूंबासह वास्तव्यास आहेत. मोहसीन हे टेम्पोचालक असून त्यांचा मोठा मुलगा शहरातील कल्याणी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिकतो. त्याला शाळेत नेण्यासाठी व शाळेतून परत घरी सोडण्यासाठी दररोज एक स्कूलबसमुल्ला यांच्या घरासमोर येते. संबंधित बस शनिवारी सकाळीही मुल्ला यांच्या घरासमोर आली. सर्व आटोपून रहिमानचा मोठा भाऊ शाळेत जाण्यासाठी घराबाहेर पडला. वडील मोहसीन हेसुद्धा त्याच्यासोबत घराबाहेर आले. याचवेळी रहिमान हा वडील व भावाच्या पाठीमागे चालत येऊन व्हॅनशेजारी थांबला. चालकाच्या शेजारीच व्हॅनलगत तो उभा होता. मात्र, हे चालकाच्या लक्षात आले नाही. मुलगा बसल्यानंतर चालकाने अचानक गाडी सुरू करून वेग वाढविला. त्यामुळे गाडीचा धक्का लागून रहिमान गाडीच्या चाकाखाली पडला. व्हॅन त्याच्या अंगावरून पुढे गेली. त्यामुळे त्यांच्या डोक्यासह पोटाला गंभीर दुखापत झाली. आई, वडीलांसमोरच रहिमान रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. या दुर्घटनेमुळे मुल्ला कुटुंबियांनी आक्रोश सुरू केला. नातेवाईकांसह परिसरातील ग्रामस्थांनी रहिमानला उपचारार्थ तातडीने स'ाद्री रूग्णालयात आणले. मात्र, रूग्णालयात पोहोचण्यापुर्वीच त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक अनिल भोसले, हवालदार राजे, देव तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून चालकाला ताब्यात घेतले. अपघाताची नोंद शहर पोलिसात झाली आहे. (प्रतिनिधी)