शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

झोपडपट्टी सुरक्षा दलाचा वाई पालिकेवर मोर्चा

By admin | Updated: June 16, 2015 01:20 IST

आंदोलक-अधिकाऱ्यांमध्ये तू तू-मैं मंै : सदनिकांचे नियमबाह्य वाटप केल्याचा आरोप

वाई : एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रमांतर्गत गुरेबाजार येथे बांधण्यात आलेल्या सदनिकांपासून मुख्य लाभार्थींना वंचित ठेवून याचे नियमबाह्य वाटप करण्यात आले आहे, असा आरोप करीत ही वाटपप्रक्रिया तत्काळ स्थगित करण्यात यावी, या मागणीसाठी सोमवारी (दि. १५) झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या वतीने नगर पालिकेवर मोर्चा काढण्यात आला. दरम्यान, पालिका अधिकारी व आंदोलकांमध्ये या विषयावरून शाब्दिक चकमक उडाली. त्यामुळे काहीकाळ तणाव निर्माण झाला होता.याबाबत महाराष्ट्र राज्य झोपडपट्टी सुरक्षा दलाचे अध्यक्ष भगवानराव वैराट यांनी नगराध्यक्षांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रमांतर्गत गुरेबाजार, सिद्धनाथवाडी झोपडपट्टीधारकांसाठी ३४२ सदनिका बनविण्याच्या योजनेला केंद्र शासनाने म्हाडा अंतर्गत मंजुरी दिली आहे. त्यापैकी ९६ सदनिकांचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, मुख्य लाभधारकांना यापासून वंचित ठेवून काही नागरिकांना सदनिकांचे नियमबाह्य वाटप करण्यात आले आहे.या प्रकल्पासाठी ११७ लाभार्थींच्या झोपड्या हटविण्यात आल्या; पंरतु बांधण्यात आलेल्या सदनिकेत त्यांना घरे देण्यात आली नाही. स्थानिक नगरसेवक व नगराध्यक्षांच्या मर्जीतील लोकांना सदनिकेचे वाटप करण्यात आल्याचा आरोप निवदेनात करण्यात आला आहे. त्यामुळे वाटपप्रक्रिया स्थगित करून खऱ्या लाभधारकांना सदनिकेचे वाटप करण्यात यावे, अशी मागणी निवदेनात केली आहे. मोर्चात सुरक्षा दलाचे कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)शाब्दिक बाचाबाचीसदनिकांचे नियमबाह्य वाटप झाल्याचा आरोप करीत भगवानराव वैराट व आंदोलनकांनी मुख्याधिकारी आशा राऊत व नगराध्यक्ष भूषण गायकवाड यांना घेराव घालून जाब विचारण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, माजी नगराध्यक्ष राजाभाऊ खरात व नगरसेवक दत्तात्रय (बुवा) खरात यांनी पालिकेत येऊन भगवानराव वैराट यांच्यापुढे अनेक प्रश्नांची सरबत्ती केल्याने आंदोलक व अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली़ पोलिसांनी हस्तक्षेप करून वातावरण शांत केले.