शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

वाममार्गावर बोलणाऱ्यांचे धनदांडग्यांबरोबर मैत्रीपर्व

By admin | Updated: June 15, 2016 00:03 IST

राष्ट्रवादी काँगे्रसचा मेळावा : शशिकांत शिंदे यांचा उंडाळकरांवर आरोप

मलकापूर : ‘कऱ्हाड दक्षिणमधील अनुभवाच्या गप्पा मारणाऱ्या नेत्याने आजपर्यंत वाममार्ग व धनदांडग्यावरच टीका केली. अशा धनदांडग्यांबरोबरचं मैत्रीपर्व करूनच उंडाळकरांनी कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत सभासदांची फसवणूक केली. अशा वेळेनुसार बदल्या राजकारणाला जनता वैतागली आहे. दक्षिण कऱ्हाडमध्ये राष्ट्रवादीला सर्वसामान्यांचा नेता म्हणून अविनाश मोहितेंच्या रूपाने सच्चा माणूस मिळाला आहे. भविष्यात अशा राजकारणाचा राष्ट्रवादीच अंत करेल,’ असा विश्वास आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला.मलकापूर येथे आयोजित राष्ट्रवादीच्या सुसंवाद मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे सरचिटणीस अविनाश मोहिते, राजेश पाटील-वाठारकर, पंचायत समितीचे सभापती देवराज पाटील, जयंतकाका पाटील, सदस्या सुरेखा शेवाळे, अशोकराव थोरात, राजकुमार पाटील, समिंद्रा जाधव, जयश्री पाटील, पांडुरंग चव्हाण, नितीन भोसले, शहाजीराव पाटील, पोपटराव साळुंखे, नंदकुमार बटाणे, डॉ. अजित देसाई, पोपटराव जाधव, अ‍ॅड. दीपक थोरात, अमोल चव्हाण, मिना बोरावके, विजयाताई पाटील उपस्थित होते.आमदार शिंदे म्हणाले, ‘कऱ्हाड दक्षिणेत विंग येथे राष्ट्रवादीने मेळावा घेतल्यामुळे विरोधकांना घाम फुटला आहे. मी संघटना करणारा प्रामाणिक कार्यकर्ता आहे. नुरा कुस्तीवाल्या पैलवानांनी माझ्या नादाला लागू नये, नाहीतर चितपट व्हाल.’ असा टोलाही त्यांनी लगावला.अविनाश मोहिते म्हणाले, ‘मी राजकारण व समाजकारणाची सुरुवात चुकीच्या माणसांबरोबर केली. जे वाममार्गाची भाषा करत होते. त्यांनीच वाममार्गाची कास धरली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून प्रत्येक गावात शाखा व घराघरात कार्यकर्ता निर्माण करणार आहे.’‘दिवंगत बापूंनी दक्षिणेत राष्ट्रवादीचे काम एकनिष्ठेने केले. ताकत कमी होती. अविनाश मोहितेंच्या रूपाने आता ताकत वाढली आहे. त्याचे चांगले परिणाम दिसून येतील,’ असे मत राजेश पाटील-वाठारकर यांनी व्यक्त केले. अशोकराव थोरात यांनी प्रास्ताविक करून आभार मानले. (प्रतिनिधी)मोदी सरकारचा दुष्काळाऐवजी जाहिरातीवर खर्चराज्यातील व केंद्रातील सरकार शेतकरी विरोधी आहे. विधानसभेच्या निवडणुकीवेळी ३५ सभा घेणाऱ्या मोदींना दुष्काळी मराठवाड्यात एकदाही वेळ मिळाला नाही. भांडवलदारांशी पायघड्या घालणाऱ्या सरकारने दुष्काळी जनतेचे प्रश्न सोडवण्याऐवजी जाहिरातीवर दीड हजार कोटी रुपये खर्च केला असल्याचा आरोप शिंदे यांनी केला.उत्तरेतून सुरुवात... उत्तरेतून शेवटकऱ्हाड दक्षिणेतील एक ज्येष्ठ नेते स्वत:च्या राजकारणाची वाटचाल उत्तरेतून झाली असल्याचे वारंवार सांगतात. आजपर्यंत धर्मांध व वाममार्गाच्या पैशावर बोलणाऱ्या या नेत्याने अशा लोकांचीच संगत धरली आहे. त्यामुळे यशवंतराव चव्हाणांवर प्रेम करणाऱ्या जनतेने त्यांच्या राजकारणाचा उत्तरेतूनच शेवट केला असल्याची बोचरी टीका या मेळाव्यात करण्यात आली.