शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

भिशीतून पावणेपंधरा लाखांची फसवणूक

By admin | Updated: October 20, 2015 23:47 IST

कुपवाडमधील घटना : दोघांना अटक; महिलांची पोलीस ठाण्यात गर्दी

कुपवाड : येथील शरदनगरमधील जयश्री भिशी मंडळाच्या संचालकांनी शहर परिसरातील ५७ जणांची पावणेपंधरा लाखांची फसवणूक केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. याप्रकरणी कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. भिशीच्या संचालिका मीना सुतारसह तिचा पती नंदकुमार कारंडे यांना पोलिसांनी अटक केली आहे. शरदनगरमध्ये जयश्री भिशी मंडळाच्या नावाखाली संचालिका मीना सुतारसह दुसरे संचालक नंदू कारंडे हे भिशी व्यवसाय करतात. तक्रारदार महिलांनी दिलेल्या माहितीनुसार, सुतार या गेल्या सात वर्षांपासून भिशी मंडळ चालवितात. या परिसरातील महिला व पुरुष नियमितपणे साप्ताहिक आणि मासिक हप्ते या भिशीमध्ये भरत होते. मागील भिशीचे वाटप नियमितपणे झाले; मात्र यावर्षी १५ आॅगस्टला फोडण्यात येणारी भिशी फोडली नाही. पैसे देण्यास संचालिका सुतार यांच्याकडून टाळाटाळ सुरू झाली. महिला व पुरुष सभासदांनी वारंवार पैशाची मागणी करूनही त्यांना पैसे मिळाले नाहीत. अखेर त्यातील ५७ जणांना भिशीमध्ये आपली फसवणूक झाल्याचा संशय आल्यानंतर त्यांनी त्वरित कुपवाड पोलीस ठाण्यात संचालकांविरोधात लेखी तक्रार दिली. त्यानंतर कुपवाडचे पोलीस निरीक्षक अशोक भवड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने संचालिका सुतार व पती कारंडे यांना अटक केली. त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यांना अटक केल्यानंतर फसवणूक झालेल्या महिलांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यासमोर गर्दी केली होती. (वार्ताहर)सण तोंडावर : महिलांच्या डोळ्यांत पाणीजयश्री भिशी मंडळाच्या संचालकांकडून फसवणूक झालेल्या बऱ्याच महिलांमध्ये एमआयडीसीतील कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या गोरगरीब कामगार महिलांचा समावेश आहे. त्यांनी पोटाला चिमटा देऊन काही पैसे भिशीमध्ये जमा केले होते; परंतु भिशी संचालकांनी पैसे परत देण्यास नकार दिल्यानंतर ऐन दिवाळीच्या तोंडावर अनेक गोरगरीब कामगार महिलांच्या डोळयात पाणी आले, तर अनेकांना रडू कोसळले.