शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जलसंधारणाच्या कामासाठी चार गावे एकत्र...

By admin | Updated: January 16, 2016 00:25 IST

माण तालुका : प्रभाकर देशमुख यांच्याकडून पाहणी; दिवडी येथे गुढ्या उभारून स्वागत

म्हसवड : ‘लोकसहभागातून महाराष्ट्राला आदर्श ठरेल, असं जलसंधारणाचं काम चार गावांनी एकत्रित येऊन केले आहे. त्या कामाचे कौतुक करायला मी आलो आहे,’ असे प्रतिपादन जलसंधारण व रोजगार हमी योजनेचे सचिव प्रभाकर देशमुख यांनी केले. दरम्यान, दिवडी येथील ग्रामस्थांनी गुढ्या उभारून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. दिवडी, ता. माण येथे चार गाव जलयुक्त शिवार पाहणी दौऱ्यादरम्यान ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन पाटील, पुण्याचे सहसंचालक मृदू संधारण ज्ञानेश्वर बोटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जितेंद्र शिंदे, ‘रोहयो’चे उपजिल्हाधिकारी पराग सोमण, कार्यकारी अभियंता डी. वाय. कदम, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, उपविभागीय कृषी अधिकारी कृष्णकांत धुमाळ, तहसीलदार सुरेखा माने, गटविकास अधिकारी सीमा जगताप, उपविभागीय अभियंता दीपक गायकवाड, तालुका कृषी अधिकारी राजेश जानकर उपस्थित होते.सचिव देशमुख म्हणाले,‘लोकसहभाग वाढवून पाणलोटाची कामे करावीत. खोल सलग समतल चरांमुळे परिसरातील सर्व विहिरी जिवंत होतात. कोणीतरी येऊन गाव जलयुक्त करील असे होत नाही. तर ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे हे सर्व शक्य होते. सयाजी शिंदे यांच्या मदतीमुळे विविध कामे आकारास आली आहेत. तुमचं कुटुंब उभं करा, गाव उभं करा मग बाकीचं बघा. गावातील प्रत्येक कामात माझं काम म्हणून लक्ष द्या. गावाच्या विकासासाठी एकत्रित येऊन इर्जिक घाला.’जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी चार गाव जलयुक्त शिवार अभियान आराखड्याचे वाचन करून ग्रामस्थांशी चर्चा केली. तसेच विविध मुद्द्यांचा आढावा घेत त्यांनी तत्काळ निर्णय घेतले. तसेच या चारही गावांतून कमीत कमी पाचशे मजूर उपलब्ध व्हावेत व त्यांच्या माध्यमातून रोजगार हमीची जास्तीत जास्त कामे व्हावीत,अशी अपेक्षा व्यक्त केली. सुभाष घाडगे-महाराज, चांगदेव सूर्यवंशी, गोडसेवाडीचे अप्पासाहेब कदम, दिवडीचे आनंदराव शिर्के, श्रीरंग जाधव यांनी ग्रामस्थांच्या वतीने मनोगते व्यक्त केली. (प्रतिनिधी)कृषी विभागामार्फत विविध कामांना प्रारंभपांढरवाडी येथे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून कृषी विभागामार्फत ५० हजार रोपांची रोपवाटिका, विहीर, पाझर तलावातील गाळ काढणे आदी कामांची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. गोडसेवाडी येथे लोकसहभागातून करण्यात आलेली खोल सलग समतल चर, पांढरवाडी येथील पाणंद रस्ता, काळेवाडी येथील नाला बांध दुरुस्ती, गाळ काढणे, खोल सलग समतल चर, दिवडी येथील ओढ्याचे खोलीकरण व रुंदीकरण आदी कामांची पाहणी करण्यात आली.