शहरं
Join us  
Trending Stories
1
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
2
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
3
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषावादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
4
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
5
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
6
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
7
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
8
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
9
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
10
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
11
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
12
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
13
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
16
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
17
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
18
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
19
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
20
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...

पंचवीस हजारात विकले चार तोळे

By admin | Updated: December 11, 2014 23:52 IST

काश्या काळेच्या लीला उघड : सराफाकडून सर्व दागिने हस्तगत

कऱ्हाड : तीन महिलांचा खून व एका महिलेस ठार मारण्याचा प्रयत्न करून सिरीअल किलर काशिनाथ काळे याने चोरलेले तब्बल चार तोळ्याचे दागिने फक्त पंचवीस ते तीस हजारात सराफांना विकल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. पोलीस पथकाने संबंधित सराफांकडून हे सर्व दागिने हस्तगत केले आहेत.वडोली निळेश्वर, ता. कऱ्हाड येथील यशोदा भोसले या महिलेच्या खुनप्रकरणी रविवार, दि. ७ रात्री काशिनाथ काळे याला अटक करण्यात आली. त्याच्याकडे कसुन तपास केला असता चोरीच्या उद्देशातून त्याने यशोदा भोसले यांचा खून केल्याचे उघडकीस आले. खून करून त्याने यशोदा भोसले यांची एक बोरमाळ, मंगळसुत्र व कर्णफुले आदी दागिणे चोरले होते. संबंधित दागिणेही काश्या काळे याने पोलिसांना दिले. वडोली निळेश्वरमधील या खुनप्रकरणाचा तपास झाल्यानंतर पोलिसांनी इतर गुन्ह्यांबाबत त्याच्याकडे तपास सुरू केला. त्यावेळी अन्य दोन महिलांचा खून व एक खुनी हल्ला असे आणखी तीन गुन्हे त्याच्याकडून उघडकीस आले. तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे, हवालदार सज्जन जगताप यांनी याप्रकरणांचा कसुन तपास केला. २२ सप्टेबर २०१३ रोजी कऱ्हाडातील लिलाबाई पवार शेतात जात असताना काशिनाथ काळेने गळा दाबून त्यांचा खून केला. त्यानंतर त्यांच्या कानातील दोन कुड्या व हजार रूपयांची रोकड असलेला बटवा घेऊन तो तेथुन पसार झाल्याचे तपासातून स्पष्ट झाले. तसेच खटाव तालुक्यातील औंध व गणेशवाडी येथे २६ फेब्रुवारी २०१४ या एकाच दिवशी काशिनाथ काळेने दोन गुन्हे केल्याचे तपासातून उघड झाले. औंध येथे ‘काळी खुरी’ नावच्या शिवारात २६ फेब्रुवारी २०१४ रोजी सायंकाळी एका महिलेला जखमी करून काशिनाथ काळेने तीच्याकडील सोन्याची माळ, कर्णफुले, बुगड्या, कुडके असे ७० हजार रूपये किमतीचे तीन तोळ्याचे दागिणे लंपास केले होते. तसेच त्याचदिवशी काळेने गणेशवाडी-औंध येथे ‘तरूळीचे माळ’ नावाच्या शिवारात भिमाबाई विठ्ठल जाधव (वय ५५) या वृद्धेचा खून केला होता.संबंधित महिला जनावरे चारण्यासाठी गेली असताना काशिनाथ काळेने तीच्या डोक्यावर प्रहार करून तीचा खून केला. त्यानंतर दागिणे घेऊन तो तेथुन पसार झाला. संबंधित तीन्ही महिलांचा खून करून चोरलेले दागिणे काशिनाथ काळेने सराफांकडे विकले होते. ते सर्व दागिणे पोलिसांनी हस्तगत केले आहेत. (प्रतिनिधी)तीन तोळे फक्त वीस हजारातखटावमधून हस्तगत केलेल्या दागिण्यांमध्ये दीड तोळ्याचे मंगळसुत्र, अर्ध्या तोळ्याची कर्णफुले, अर्ध्या तोळे वजनाच्या कुड्या, अर्ध्या तोळ्याच्या रिंग्ाां अशा तीन तोळ्याच्या दागिण्यांचा समावेश आहे. संबंधित दागिणे काशिनाथ काळेने फक्त वीस हजाराला विकले होते.आरोपी काशिनाथ काळे याच्याकडून आत्तापर्यंत काही दागिणे हस्तगत करण्यात आले आहेत. त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येतात का, याचा सध्या तपास केला जात असुन नागरीकांना त्याबाबत काही माहिती असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा. - स्वप्नील लोखंडे,सहाय्यक पोलीस निरीक्षक