शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

‘अजिंक्यतारा’च्या चार जागा बिनविरोध

By admin | Updated: March 5, 2016 00:09 IST

शिवेंद्रसिंहराजे, वेदांतिकाराजेंचाही अर्ज : २१ संचालक पदांसाठी ३५ उमेदवारी अर्ज दाखल

सातारा : शेंद्रे येथील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीतील २१ संचालक पदांसाठी ३५ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. शुक्रवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख होती. शनिवारी सकाळी ११ वाजता नियोजन भवनात दाखल उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संजीव देशमुख यांनी दिली. संस्था ब गट, अनुसूचित जाती-जमाती, इतर मागास प्रवर्ग व भटक्या विमुक्त जाती-जमाती या मतदारसंघांतील प्रत्येकी एक अशा चार जागा बिनविरोध झाल्याचे चित्र सध्यातरी स्पष्ट दिसत आहे.संस्था ब गटामध्ये हरी साळुंखे (रा. नागठाणे, ता. सातारा), अनुसूचित जाती-जमातीमधून अनंता वाघमारे (शेंद्रे, ता. सातारा) इतर मागासवर्गात यासिन इनामदार (पवाराची निगडी, ता. सातारा), भटक्या जाती व जमातीमधून सुरेश माने (टिटवेवाडी, ता. सातारा) यांचा एका जागेसाठी प्रत्येकी एक अर्ज दाखल झाला आहे. त्यामुळे या चारही जागा बिनविरोध होण्यात जमा आहेत. ऊसउत्पादक मतदारसंघात सातारा गटातून प्रवीण शिंदे (पाटखळ, ता. सातारा), नामदेव सावंत (चिंचणी, ता. सातारा), आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले (सातारा), इंद्रजित नलवडे (वाढे, ता. सातारा), गणपत शिंदे (पाटखळ, ता. सातारा), नागठाणे गटात अशोक शेडगे (भरतगाव), माधव जाधव (निनाम पाडळी), प्रदीप पवार (मांडवे), संजय जाधव (अपशिंगे), किसन पवार (मांडवे). अतीत गटातून मनोहर घाडगे ( फत्यापूर), रामचंद्र जगदाळे (नांदगाव), राजाराम जाधव (काशीळ), प्रकाश जाधव (काशीळ) (२ अर्ज), प्रशांत पाटील (नांदगाव), दत्तात्रय घोरपडे (निसराळे). चिंचणेर गटात सयाजीराव ताटे (तासगाव), विनायक बर्गे (चिंचणेर), विश्वास शेडगे (अंगापूर), सतीश चव्हाण (महागाव). गोवे गटातून अर्जुन साळुंखे (वनगळ), अशोक साबळे (शिवथर), सर्जेराव सावंत (लिंब), नितीन पाटील (मर्ढे), महेंद्र पवार (आरफळ), दिनकर पवार (लिंब), मोहन साळुंखे, राऊतवाडी (ता. वाई) यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. महिला राखीव गटात दोन जागांसाठी वेदांतिकाराजे भोसले यांच्यासह विद्या शिंदे (सोनगाव सं. निंब) व अनुसया शिंदे (पाटखळ) यांचे अर्ज दाखल झाले आहेत.अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याला बिनविरोधची परंपरा आहे. या कारखान्याची सत्ता कायमच दिवंगत मंत्री अभयसिंहराजे भोसले यांना व त्यानंतर आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना मानणाऱ्या गटाकडे राहिली आहे. उमेदवारी अर्जांची छाननी शनिवारी होईल.सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून साताऱ्याचे तहसीलदार राजेश चव्हाण काम पाहत आहेत. (प्रतिनिधी) कारखान्याकडून मागविली माहितीसहकार कायद्यातील तरतुदीनुसार सलग पाच वर्षांमध्ये सलग तीन वर्षे कारखान्याला ऊस घालणाऱ्या ऊस उत्पादकालाच निवडणुकीमध्ये ऊसउत्पादक गटातून अर्ज दाखल करता येईल. त्यामुळे दाखल अर्जांपैकी किती जणांची गच्छंती होणार, हे शनिवारी स्पष्ट होईल. त्यासाठी कारखान्याला सलग तीन वर्षे किती सभासदांनी ऊस घातला. याचा अहवाल निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कारखान्याच्या कार्यकारी संचालकांकडून मागविला आहे.दि. ३ एप्रिलला मतदान...निवडणुकीतून माघार घेण्यासाठी ८ ते २२ मार्च या कालावधीत अर्ज मागे घेता येणार आहे. निवडणुकीचे चिन्हवाटप २३ मार्च रोजी नियोजन भवनात होईल. निवडणूक लागल्यास ३ एप्रिल रोजी मतदान व ५ एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे.