शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

शिरवळजवळ विचित्र अपघातात चार जखमी

By admin | Updated: June 3, 2017 12:20 IST

टेम्पो, कार अन् जीपची धडक

आॅनलाईन लोकमतशिरवळ (सातारा), दि. 0३ : : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील शिरवळ हद्दीत रस्ता दुभाजकालगत शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या तीन वाहनांच्या विचित्र अपघातांत चार जण जखमी झाले. त्यातील एकाची प्रकृती गंभीर असून शिरवळच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शिरवळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड येथील विकास शिवाजी बल्लाळ (वय ३०) हे पत्नी धनश्री यांच्यासमवेत दोन दिवस सुटीसाठी चिंचवडहून मूळ गावी सातारा तालुक्यातील कुसवडेला कार (एमएच ११ एके ०६६०) ने निघाले होते. त्यांची कार शिरवळ हद्दीत आली असता अचानकपणे रस्ता दुभाजकांसमोरून शिरवळ येथील बाजार उरकून तीन चाकी टेम्पो रस्ता दुभाजक ओलांडण्यासाठी आडवा आला. टेम्पो अचानक आडवा आल्याने कारची जोरदार धडक बसून टेम्पो (एमएच १२ एलडी ५२८) हा उंच उडून रस्ता दुभाजकामध्ये जाऊन पडला. यावेळी कारच्या पाठीमागे असणारी जीप (एमएच ५० ए २६७०) ने कारला जोरदार धडक दिली. अपघातानंतर टेम्पोचालक सुरेश गोविंद कानडे (वय ५८) हे गंभीर जखमी झाले. तर लता सुरेश कानडे (५५, दोघे रा. पिराचा मळा, भोर जिल्हा पुणे) तसेच कारमधील विकास शिवाजी बल्लाळ (३०) व धनश्री विकास बल्लाळ (२९) हे कारच्या काचेवर पडल्याने जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच शिरवळचे पोलिस निरीक्षक संभाजीराव म्हेत्रे व पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना ग्रामस्थांच्या मदतीने तातडीने पोलिस जीप व खाजगी वाहनाने शिरवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले. गंभीर जखमी झालेल्या सुरेश कानडे यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहे. या घटनेची फिर्याद कारचालक विकास बल्लाळ यांनी शिरवळ पोलिस स्टेशनला दिली असून या घटनेची नोंद शिरवळ पोलिस ठाण्यात झाली आहे. सहायक पोलिस उपनिरीक्षक पांडुरंग हजारे करीत आहे. जीव धोक्यात घालून फोटोग्राफीशिरवळ येथील शिर्के कंपनीजवळ झालेल्या अपघातानंतर बघ्यांनी मोठी गर्दी केल्याने वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झाला होता. यावेळी वाहतूक सुरळीत करताना बघ्यांना आवरताना शिरवळ पोलिसांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. यावेळी बघे मात्र अपघातग्रस्तांना मदत करण्याऐवजी मोबाईलवर महामार्गावर जीव धोक्यात घालून फोटो काढत सदरच्या अपघाताची छायाचित्रे सोशल मीडियावर पोस्ट करण्यात धन्यता मानत होते. दरम्यान अपघातानंतरही दुचाकीचालक व चारचाकी चालक धोकादायकरीत्या विरुद्ध दिशेने महामार्ग ओलांडत होते.