शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सव्वा चारशे कर्मचाºयांनी घेतले निवडणुकीचे धडे-दहा कर्मचारी गैरहजर : फलटणमध्ये प्रशिक्षणाचा पहिला टप्पा पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 16:10 IST

मतदार संघामध्ये निवडणूक प्रक्रियेसाठी ८७७ केंद्राध्यक्ष, सहायक केंद्राध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली. या कर्मचाºयांचे पहिले प्रक्षिण फलटण येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक भवनमध्ये पार पडले. यामध्ये ४१९ कर्मचाºयांना निवडणूक प्रक्रियेचे धडे देण्यात आले.

फलटण   -मतदार संघामध्ये निवडणूक प्रक्रियेसाठी ८७७ केंद्राध्यक्ष, सहायक केंद्राध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली. या कर्मचाºयांचे पहिले प्रक्षिण फलटण येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक भवनमध्ये पार पडले. यामध्ये ४१९ कर्मचाºयांना निवडणूक प्रक्रियेचे धडे देण्यात आले.

निवडणूक निर्णय अधिकारी आर. टी. शिंदे, संतोष जाधव, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तसेच तहसीलदार हनुमंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. सोळा कर्मचारी गैरहजर राहिले. तसेच दुसºया सत्रात ४३२ कर्मचाºयांनी उपस्थिती लावली. 

प्रशिक्षणात कर्मचाºयांना इव्हीएम मशीनबाबत प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर इव्हीएम मशीन प्रिप्रेशन करणे, व्हीव्हीपॅटबाबत माहिती देण्यात आली. इव्हीएम मशीन प्रत्यक्ष हाताळणीबाबत हणमंतराव पवार हायस्कूल येथे प्रशिक्षण देण्यात आले. यापूर्वी निवडणूक पूर्व कामासाठी ५२ कर्मचाºयांची निवड करण्यात आली. नेमणूक पत्र देऊनही सदर कामास तीन कर्मचारी गैरहजर राहिले. 

फलटण तालुका व शहरातील विविध शासकीय व निमशासकीय कार्यालयाच्या ठिकाणी मतदान जनजागृती मोहीम कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. राष्ट्रीय महोत्सव सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या तिसºया टप्प्यात मतदान करण्याची संधी गमावू नका असा संदेश या कार्यक्रमात देण्यात येत आहे.

सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा फलटणचे उपविभागीय अधिकारी संतोष जाधव,  तहसीलदार हणुमंत पाटील, नायब तहसीलदार अनंत गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध ठिकाणी मतदान जनजागृती कार्यक्रम सुरू आहेत. 

उपस्थित कर्मचाºयांना नोटीसा

निवडणूक कामासाठी नेमलेले तीस निवडणूक कर्मचारी गैरहजर आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी घेण्यात आलेल्या प्रशिक्षणास व मतदान पूर्व कामास गैरहजर राहणाºया कर्मचाºयांना नोटीसा पाठविण्यात आलेल्या आहेत. हजर न होणाºया कर्मचाºयांवर गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली.

टॅग्स :ElectionनिवडणूकVotingमतदान