शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

गंजलेल्या चारशे कुलपांना पुन्हा दारूचा घमघमाट

By admin | Updated: July 6, 2017 23:54 IST

गंजलेल्या चारशे कुलपांना पुन्हा दारूचा घमघमाट

प्रशांत कोळी । लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : महामार्गावरील मद्यबंदी निर्णयाची अंमलबजावणी करताना शहरातून जाणारे महामार्ग वगळले तर त्यात गैर काहीही नाही. राज्य सरकार असे मार्ग वगळून मद्यविक्री परवानगी देऊ शकतात, असे सर्वोेच्च न्यायालयाने स्पष्ट केल्याने जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये सुमारे चारशेपेक्षाही जास्त ठिकाणी बंद असलेली दारू दुकाने पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. गंजलेल्या कुलपांना पुन्हा दारूचा घमघमाट सुटू शकतो.न्यायालयाच्या या भूमिकेमुळे दारू व्यावसायिकांच्या आशा पल्लवीत झाल्या असून या निर्णयाकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य मार्गापासून ५०० नंतर २२० मीटरपर्यंत असणारी देशी-विदेशी दारू दुकाने व परमीट रूम बिअर बार १ एप्रिलपासून बंद करण्यात आले आहेत. सर्वोेच्च न्यायालयाने राष्ट्रीय मार्ग आणि राज्य मार्गालगत असणारी दारू दुकाने, परमीट रूम आणि बिअर बार बंद करण्याचा आदेश काढला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील एकूण ६१५ दारू दुकाने आणि बार पैकी ५०२ देशी-विदेशी दारूची दुकाने, परमीट रूम आणि बार बंद करण्यात आले आहेत. त्याचा फटकाही मोठ्या प्रमाणात महसूलला बसला आहे. दरम्यान, एका याचिकेच्या सुनावणीवेळी न्यायालयाने एखादा महामार्ग वळवून मद्यविक्रीला परवानगी देत असतील तर, त्यात काहीही गैर नाही, असे स्पष्ट केले. त्यामुळे जिल्ह्यातील गावांमध्ये बंद झालेली जवळपास चारशे दारू दुकाने पुन्हा सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जिल्ह्यातील नगरपालिका, नगर परिषद, नगरपंचायत, पंचायत समिती, ग्रामपंचायत आदी ठिकाणी जर हा निर्णय लागू झाला तर जिल्ह्यातील ५०२ दारू दुकाने, बार पैकी सुमारे ४०० दारू दुकाने सुरू होतील. परिणामी महसुलात वाढ होणार आहे. मात्र महिलांमधून या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. शासनाने यंदा सातारा जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाला देशी-विदेशी मद्यामधून ५८५ कोटींचा महसूल गोळा झाला पाहिजे, असे टार्गेट दिले आहे, पण दारूबंदीच्या निर्णयानंतर ८० कोटी महसूल जमा करणेही त्यांना शक्य होईनासे झाले आहे. दारूबंदीचा परिणाम महसुलावर झाला आहे. न्यायालयाच्या या निर्णयाने जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गावरील आणि शहरी आणि ग्रामीण अंतर्गत भागात असणारी दारू दुकाने, परमीट रूम, बिअर बार पुन्हा पूर्ववत होतील, असा अंदाज व्यावसायिकांनी बांधला आहे. न्यायालयाच्या या निर्णयाने बार मालकांना दिलासा मिळाण्याची शक्यता आहे. त्यामुळे बिअरबार मालकांचे लक्ष या निर्णयाकडे लागून राहिले आहे. गावठाण भागातील दुकाने हाऊस फुल्लसातारा शहरातील मल्हार पेठ, गोडोली, नगरपालिकानजीक तसेच नगरवाचनालयजवळ रात्रीच्या वेळेस ग्राहकांची मोठी गर्दी असते. या ठिकाणी असलेल्या दारू दुकानांना सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत यात्रेचे स्वरूप आल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे रात्रीच्या वेळी या परिसरात वाहतूक कोंडी होत आहे. तसेच गुहागर-पंढरपूर राज्यमार्गावरील कऱ्हाड-ढेबेवाडी या मार्गावर दुकानांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळते. कऱ्हाड शहरातील दुकाने बंद असल्याने मद्यपींची पावले आपसुकच या मार्गाकडे वळत आहेत. तसेच वडूज या ठिकाणी चोरी छुपके पद्धतीने विक्री सुरू आहे. दहिवडीमध्ये ही रात्रीच्या वेळी परिसरातील गावांमधील मद्यपींची वर्र्दळ होत आहे. शिरवळमध्ये आसपासच्या गावासह, परजिल्ह्यातील लोकांची मोठी राबता या ठिकाणी पाहताना मिळत आहे.