अमित हणमंत कदम (रा. अंतवडी, ता. कऱ्हाड), मनोहर ऊर्फ सोन्या मुरलीधर जाधव (रा. सैदापूर), विशाल सुनील पिसाळ, अजिंक्य बबन उगले (दोघेही रा. करवडी, ता. कऱ्हाड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारुंजीतील सुनील पाटील यांच्या चिंचमळा येथील अल्ट्राकन सोल्युशन काँक्रिट प्लॅन्टवरून १०० लिटर डिझेल ३ जानेवारी रोजी चोरीस गेले होते, तर त्याच ठिकाणाहून गत महिन्यात दोन ब्रेकर, इलेक्ट्रीक मोटर, लोखंडी पानेही चोरीस गेली होती. तसेच १ जानेवारी रोजी वाघेरीतील पौर्णिमा हॉटेलमधून गॅसची टाकी, शेगडी, मिक्सरही चोरट्यांनी लंपास केला होता. कऱ्हाड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेकडून या घरफोड्यांचा तपास सुरू होता. पोलीस उपअधीक्षक रणजित पाटील व निरीक्षक बाळासाहेब भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणात गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक उदय दळवी, पोलीस नाईक शशिकांत काळे, सज्जन जगताप, अमित पवार, उत्तम कोळी, शशिकांत घाडगे, अमोल हसबे यांच्या पथकाने रेकॉर्डवरील आरोपी अमित कदम याच्यासह त्याच्या तीन साथीदारांना अटक केली. त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
फोटो : ०७केआरडी०६
कॅप्शन : कऱ्हाड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेने घरफोडी करणाऱ्या टोळीला ताब्यात घेऊन अटक केली.