शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल टॉवरच्या नावाखाली साडेबारा लाखांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 21:18 IST

सातारा : मोबाईल टॉवरच्या नावाखाली साताऱ्यातील एका सेवानिवृत्ताची १२ लाख ४८ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात ...

सातारा : मोबाईल टॉवरच्या नावाखाली साताऱ्यातील एका सेवानिवृत्ताची १२ लाख ४८ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. आता पोलीस संबंधितांचा शोध घेत आहेत. दरम्यान, गुगल पे वरून ही सर्व रक्कम संबंधितांच्या बँक खात्यावर वर्ग झाली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,अरुण जयसिंगराव देशमुख (वय ६५, रा. गडकर आळी, सातारा) यांची टॉवर बांधकामाच्या नावाखाली फसवणूक झाली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार देशमुख यांच्या वाचनात एक जाहिरात आली होती. त्यातील नंबरवरून देशमुख यांनी फोन केला असता समोरून प्रथम गौरव शर्मा नावाची व्यक्ती बोलली. त्यावेळी त्याने ‘प्रवेश शुल्क १ हजार ३५० असून, टॉवरचे वकील विजय मुंडा यांच्या बँक खात्यावर ते पाठवा,’ असे सांगितले. त्यानंतर त्याने रांचीतील एका बँकेतील खाते क्रमांक दिला. त्यानुसार देशमुख यांनी १७ जुलै रोजी प्रथम १ हजार ४०० रुपये बँक खात्यात पाठविले. त्यानंतर शर्माने ‘आम्ही उपग्रहाच्या आधारे तुमच्या ठिकाणाची तपासणी केली असून, तेथे टॉवर बसविणे योग्य आहे. तसेच त्याला कंपनीकडूनही मान्यता मिळालीय. आता करार करण्यासाठी २६ हजार ८०० रुपये खात्यावर जमा करावे लागतील,’ असे सांगितले. त्यानंतर अशाच प्रकारे बँक कमिशन, कागदपत्रे, गाडीसाठी डिझेल, चालक खर्च, मॅनेजर कमिशन, पोलिसांनी गाडी पकडली, गाडीचे टायर फुटले, चालकाचा जेवणाचा खर्च, कर भरणे आदी विविध कारणे सांगून १२ लाख ४८ हजार ४०० रुपये खात्यावर घेतले. हे पैसे गुगल पे वरून पाठविण्यात आले. त्यानंतरही मोबाईल टॉवरसाठी साहित्य किंवा करारही देशमुख यांना मिळाला नाही.आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने अरुण देशमुख यांनी गौरव शर्मा, अ‍ॅड. विजय मुंडा आणि संजय बन्सल (पत्ता नाही) यांच्याविरोधात १२ लाख ४८ हजार ४०० रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर पोलिसांनी तिघांच्या विरोधात गुन्हा नोंद करून शोध सुरू केला आहे....................................................