शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

मलकापुरात हरकतींचा पंधरवडा

By admin | Updated: December 21, 2014 00:37 IST

नगरपंचायतीत झुंबड : करवाढीवर २५ तर आरक्षणांवर २७ डिसेंबर अंतिम मुदत, नागरिक संभ्रमात

मलकापूर : मलकापुरात सध्या करवाढ व शहर विकास आराखड्यातील आरक्षणे हे दोन मुद्दे नागरिकांच्या दृृष्टीने जिव्हाळ्याचे बनले आहेत़ करवाढीवर हरकती दाखल करण्यासाठी २५ तर आरक्षणांवर हरकती दाखल करण्यासाठी २७ डिसेंबर ही अंतिम मुदत असल्यामुळे मलकापुरात हरकतींचा पंधरवाडा साजरा होत आहे़ काम धंदा सोडून सध्या हरकती दाखल करण्यासाठी झुंबड उडाली आहे़ मलकापूर नगरपंचायतीने गेल्या सहा वर्षांत अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम यशस्वीपणे राबवित आपले नाव जागतिक पातळीवर नेऊन ठेवले आहे़ सोयी-सुविधांच्या बाबतीत अग्रेसर असलेल्या मलकापुरात सध्या संकलित करवाढ लागू केली आहे़ त्यामुळे नागरिकांना दुप्पट ते चौपट कराची नोटीस मिळाली आहे़ या नवीन पद्धतीच्या करवाढीवर हरकती दाखल करण्यासाठी २५ डिसेंबर ही अंतिम मुदत देण्यात आली आहे़अव्वाच्या सव्वा कराची रक्कम पाहून सर्वच नागरिकांची झोप उडाली आहे़ या निर्णयाच्या विरोधात हरकती दाखल करण्यासाठी शिवसेनेसह विविध संघटनांनी व नागरिकांनी कंबर कसली आह़े़ नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये हरकती दाखल करण्यासाठी चांगलीच गर्दी होत आहे़ आलेल्या हरकतींवर २६ ते ३० या कालावधीत सुनावणी होणार असल्याचे नियोजन नगरपंचायतीमार्फत करण्यात आली आहे़ त्याचबरोबर शहराचा सुधारित शहर विकास आराखडा ५७ आरक्षणांसह प्रसिद्ध झाला आहे़ या आरक्षणांवर हरकती दाखल करण्याची अंतिम मुदत २७ डिसेंबर ठेवण्यात आली आहे़ ज्यांच्या शेतीवर आरक्षणे निर्देशित केली आहेत़ अशा नागरिकांना या आरक्षणांच्या हरकती दाखल करावयाच्या आहेत़ त्याचीही सध्या गडबड सुरू आहे़ त्यामुळे मलकापुरात सध्या हरकतींचाच पंधरवाडा सुरू असल्याचे चित्र निर्माण झाले आहे़ (प्रतिनिधी)