शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

‘बांधकाम’चा पुन्हा मलमपट्टी ‘फॉर्म्युला’

By admin | Updated: June 22, 2015 00:25 IST

आगाशिवनगर रस्त्याचे त्रांगडे : चौपदरी रस्त्याचे सुशोभीकरण रखडले; चार वर्षांत डांबरीकरणही नाही, ठरावाला केराची टोपली

मलकापूर : ढेबेवाडी फाटा ते महिला उद्योग या दोन किलोमीटरच्या रस्त्याचे रुंदीकरण होऊन सहा वर्षे झाली. हे रुंदीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असतानाही गेल्या सहा वर्षांत कोणतीही देखभाल दुरुस्ती केली गेलेली नाही. संपूर्ण उन्हाळा उलटून गेला; मात्र डांबरीकरणही केले नाही व दुभाजकातील सुशोभीकरणही झाले नाही. अशातच बांधकाम विभागाने पुन्हा एकदा या रस्त्यावरील केवळ खड्डे मुजविण्याचेच लक्षण दाखवले आहे. कऱ्हाड-ढेबेवाडी रस्त्याच्या आगाशिवनगर मधील दोन किलोमीटरच्या पट्ट्याच्या रुंदीकरणासाठी पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून २ कोटी ४० लाख निधी दिला होता. केवळ २.२ किलोमीटर साठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होऊनही निधीच्या प्रमाणात आवश्यक तेवढे दर्जेदार काम झाले नाही. या रस्त्याचे पुन्हा डांबरीकरण व सुशोभीकरण करण्यासाठी मनोहर शिंदेंसह नगरसेवकांनी नगरपंचायत सभेत ठराव करून घेतला. तसा बांधकाम विभागाकडे पाठपुरावाही केला. मात्र ‘पालथ्या घड्यावर पाणी’ या म्हणीनुसार गेली चार वर्षे कोणतीही उपाययोजना केलेली नाही. केवळ रस्त्याला पडलेले खड्डे मुजविण्याचेच काम करण्याकडे भर दिला जात आहे. या बांधकाम विभागाच्या उदासीनतेबाबत नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. रुंदीकरणावेळी रस्त्याला दुभाजक निर्माण केला आहे. या दुभाजकात नगरपंचायतीने पथदिवेही बसवले आहेत. गेल्यावर्षी पावसाळ्यापूर्वी सुशोभीकरणासाठी दुभाजकात मातीही भरण्यात आली होती. मात्र, आजतागायत या दुभाजकाचे सुशोभीकरण करण्यात आले नाही. त्यामध्ये वाढलेले गवतही विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान नगरपंचायतीच्या वतीने एकदाच काढण्यात आले. रस्त्याच्या दुतर्फा असलेले फूटपाथ वेल झाडींनी व्यापलेले आहेत. याची स्वच्छता करण्याकडेही बांधकाम विभाग दुर्लक्षच करत आहे. किमान या पावसाळ्यात तरी दुभाजकाचे सुशोभीकरण होणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. (प्रतिनिधी) डासांचा प्रादुर्भाव...आगाशिवनगर रस्त्याच्या रुंदीकरणानंतर दोन किलोमीटरच्या पट्ट्यातील गटारांची गेल्या सहा वर्षांत साफसफाई कोणीही केलेली नाही. या नाल्याची देखभाल दुरुस्ती ही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असल्यामुळे साफसफाईसाठी कोणीही फिरकत नाही. ठिकठिकाणी नाले तुंबल्यामुळे या परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. दुभाजक, नालाच नाहीइमर्सन कंपनी ते महिला उद्योग या पट्ट्यात गेल्या सहा वर्षांत दुभाजक बनवण्यात आले नाहीत. त्याचबरोबर रुंदीकरणाचा निधी एवढा भरमसाठ असतानाही याच पट्ट्यातील रस्त्याच्या उत्तरेकडील बाजूस नालाही व फूटपाथही बनवलेला नाही. या भागातील सांडपाण्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबितच आहे. फूटपाथची दुरवस्था रस्त्याच्या रुंदीकरणावेळी पादचाऱ्यांना रस्त्यावरील वाहनाचा त्रास होऊ नये म्हणून फूटपाथची निर्मिती करण्यात आली आहे. मुळातच फूटपाथ बनवतानाच चुकीच्या पद्धतीने बनविण्यात आल्यामुळे त्याचा वापरच होत नाही. अनेक ठिकाणी तोडफोड झाली असून, काही ठिकाणी मातीचे व कचऱ्याचे ढीग टाकल्यामुळे फूटपाथची दुरवस्था झाली आहे.