शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

शवविच्छेदन नसेल तर आर्थिक मदत विसरा!

By admin | Updated: August 7, 2016 01:04 IST

नैसर्गिक आपत्ती : जिल्ह्यात ४ मृतांच्या नातेवाइकांना १६ लाखांची मदत

सातारा : चालू वर्षीच्या पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीने मृत्युमुखी पडलेल्या ४ मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना जिल्हा प्रशासनाने १६ लाखांची मदत केली आहे. एका व्यक्तीच्या कुटुंबीयांनी मृताचे शवविच्छेदन करण्यास विरोध केल्याने मदत मिळू शकलेली नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आली. नैसर्गिक आपत्तीमध्ये आर्थिक मदत मिळण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून केला जाणारा पंचनामा व शवविच्छेदन अहवाल या दोन बाबी महत्त्वाच्या आहेत.नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या नुकसानीबाबत शासनाच्या माध्यमातून नुकसान भरपाई दिली जाते. पुरात वाहून गेलेली व्यक्ती, विजेचा धक्का लागून मृत्यू, वीज अंगावर पडून मृत्यू, दरड कोसळून मृत्यू आदी घटनांमध्ये ही मदत दिली जाते. मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या नातेवाइकांना ४ लाख रुपये इतकी आर्थिक मदत दिली जाते. चांभारवाडी, ता. फलटण येथील सोमनाथ उत्तम चतूर यांचा दि. ३ जून २०१६ रोजी वीज पडून मृत्यू झाला होता. रामवाडी, ता. जावली येथील अशोक विठ्ठल पाडळे यांचाही वीज पडून दि. ८ जून २०१६ रोजी मृत्यू झाला. ऐनाकवाडी, गोकूळ तर्फ हेळवाक, ता. पाटण येथील लक्ष्मण शंकर कदम यांचाही दि. १० जुलै २०१६ रोजी ओढ्याच्या पुलात वाहून जाऊन मृत्यू झाला होता. नांदगाव, ता. कऱ्हाड येथील बाबासो कोंडिबा मकानदार यांचा दि. १३ जुलै रोजी दक्षिण मांड नदीच्या पुरात वाहून जाऊन मृत्यू झाला होता. या सर्वांना जिल्हा प्रशासनातर्फे प्रत्येकी ४ लाख अशी एकूण १६ लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे. दरम्यान, अंबवडे (ता. खटाव) येथील निखिल संभाजी पवार यांचा दि. ७ जून २०१६ रोजी अंगावर वीज पडून मृत्यू झाला होता. मात्र, त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदनच झाले नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांना ही आर्थिक मदत मिळू शकलेली नाही. तसेच विजापूर, कर्नाटक येथील लक्ष्मण कापू राठोड यांच्या अंगावर वीज पडून त्यांचा मृत्यू झाला होता. ही व्यक्ती कर्नाटक राज्यातील असल्याने संबंधित राज्यामार्फत मदत मिळण्यासाठी हे प्रकरण तहसीलदारांकडे पाठविण्यात आले आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये जिल्ह्यातील सहा जनावरे दगावली. त्यापैकी दुधाळ जनावरांना प्रत्येकी ३० हजार रुपये अशी मदत करण्यात आली आहे. मृत जनावरांच्या मालकांना दीड लाख रुपये इतकी नुकसान भरपाई देण्यात आली आहे. १७० घरांची पडझड झाली. एक झोपडी व ११ जनावरांच्या गोठ्यांचे नुकसान झाले. पूर्णत: पडझड झालेल्या २ घरांपैकी एक घर मदतीसाठी पात्र ठरले आहे. अंशत: पडझड झालेल्या पक्क्या ६१ घरांपैकी ४४ घरे मदतीस पात्र ठरली आहेत. अंशत: पडझड झालेल्या १६९ कच्च्या घरांपैकी ७१ घरे मदतीला पात्र ठरली आहे. बांधकाम विभागातर्फे संबंधित नुकसानीची तपासणी केली जात आहे. पात्र ठरलेल्यांपैकी आणखी काहीजण अपात्र ठरण्याची शक्यता आहे. चालू पावसाळ्यात सार्वजनिक मालमत्तेचे ९७ लाखांचे नुकसान झाले आहे. (प्रतिनिधी)प्रेत सापडले नसल्याने मदत प्रलंबितलिंब, ता. सातारा येथील कृष्णा नदी पुलावरून रवींद्र भरत जाधव (रा. गोवे व जिहे, ता. सातारा) येथील रघुनाथ महादू जाधव हे दोघे पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत. त्यांचे मृतदेह अद्याप सापडलेले नाहीत. वेंगळे, ता. महाबळेश्वर येथील शंकर भिवा संकपाळ यांचा ओढ्याच्या पुरात बुडून मृत्यू झाला. पोलिस पंचनामा व शवविच्छेदन अहवाल जिल्हा प्रशासनाला अद्याप प्राप्त झालेला नाही.२० कुटुंबे स्थलांतरित..फलटण तालुक्यातील जाधववाडी (साठे) या गावातील नीरा नदी काठावरील एकूण २० कुटुंबांतील ५८ व्यक्तींचे पुराच्या पाण्यामुळे इतरत्र सुरक्षित स्थळी स्थलांतरण करण्यात आले आहे.