शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

चॅरिटीसाठी परदेशी पाहुण्यांचा पणजी-मुंबई प्रवास !

By admin | Updated: June 19, 2015 00:19 IST

नॉर्वेतून भारत भ्रमण : सातारकरांच्या सहकार्याने प्रफुल्लीत झाले पाहुणे

साई सावंत - कोंडवे -तेल निर्मितीत अग्रेसर असलेला देश म्हणून ओळख असलेल्या नॉर्वे येथील सहा नोकरदार तरूण भारत भ्रमणासाठी आले आहेत. दहा दिवसांच्या त्यांच्या या भारत भेटीत ते पणजी ते मुंबई असा प्रवास रिक्षातून करणार आहेत. या प्रवासासाठी मिळणारे मानधन ते येथील एका शाळेस देणार आहेत. सातारकरांच्या आदरातिथ्याने हे पाहूणे चांगलेच भारावले आहेत. नॉर्वे येथील ओयस्टन, जॉर्जन, इंग्वार, रॉबर्ट, मार्कस आणि थॉमस या सहा नोकरदारांनी लोकसेवेचा संकल्प करून भारत देशाची निवड केली. त्यांच्याबरोबर सहा जणांच्या चार टीम आल्या आहेत. भारताच्या चार कोपऱ्यांमध्ये जावून भटकंती करून मिळणाऱ्या मानधनातून ते शाळांना देणगी स्वरूपात मदत करणार आहेत. कोल्हापूरहून पुण्याकडे जाणाऱ्या या परदेशी पाहुण्यांनी सातारा शहरास भेट दिली. दोन रिक्षांतून सहा जणांचा हा प्रवास पणजीपासून सुरू झाला. साताऱ्यात असणारे ढगाळ वातावरण त्यांना आवडले. या वातावरणामुळे त्यांना उन्हाचा तडाखा जाणवला नाही. भाषेवर देहबोलीने मात!पणजी ते मुंबई हा प्रवास करताना या नॉर्वे निवासी परदेशी पाहुण्यांना भन्नाट अनुभव आले. त्यांच्यातील केवळ दोघांनाच इंग्रजी बोलता येते. या प्रवासात संवाद साधताना, जेवताना काही अन्न पदार्थ मागविताना त्यांना भाषेचा त्रास होवू लागला. त्यावर शक्कल लढवत त्यांनी देहबोलीवरून आपल्या आवश्यक असणाऱ्या गोष्टींविषयी मागणी केली. तीन दिवसांच्या त्यांच्या या प्रवासात त्यांनी दोन ठिकाणी मुक्काम केला आहे. हा प्रवास करताना त्यांनी मोबाईलवर ‘नॅव्हीगेशन’चा उपयोग करून मार्ग शोधला. जेवण, पेट्रोल, नाष्टा आणि अन्य गोष्टींसाठी मात्र त्यांना देहबोलीचा उपयोग करावा लागला.सातारकरांची फोटो क्रेझ!पहिल्यांदाच भारतात आलेल्या या परदेशी पाहूण्यांना भारतीयांचे फोटो प्रेम फारच आवडले. ‘आम्ही कुठेही गेलो आणि कोणालाही मदत मागितली की ते पहिल्यांदा फोटो काढू का? असे विचारतात. प्रत्येकजण आमच्याबरोबर फोटो काढण्यास उत्सुक असतो. भारतीयांच्या आदरातिथ्याविषयी आम्ही ऐकलं होता, त्याचा चांगला अनुभव आम्ही साताऱ्यातही घेत आहोत’, असे या पाहुण्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगिंतले.भारतीय लोक प्रेमळ आहेत. साताऱ्याविषयी बोलायचे झाले तर इथे प्रत्येकजण विनामोबदला मदत करायला तयार आहेत. शहरात उत्तम जेवणाची सोय कुठे आहे, असे विचारल्यावर एका व्यक्तिने आम्हाला चक्क त्या हॉटेलच्या दारात नेवून सोडले. इतकी आत्मीयता आणि निर्व्याज प्रेम अन्य शहरांमध्ये अभवानेच पहायला मिळते. - ओयस्टन, नॉर्वे