रामापूर : ‘हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद याचा जन्मदिन हा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. अशावेळी या महान खेळाडूचा आदर्श घेऊन खेळाडूंनी वाटचाल करावी,’ असे आवाहन प्राचार्य डॉ. एस. डी. पवार यानी केले.
पाटण येथील बाळासाहेब देसाई कॉलेजमध्ये क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य डॉ. एस. डी. पवार यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी जिमखाना विभागात ऑलिम्पिकमध्ये देशासाठी पदके मिळविलेल्या खेळाडूंच्या जीवनावर आधारित भित्तीफलक लावण्यात आले. याचेही उद्घाटनही यावेळी करण्यात आले.
यावेळी जिमखाना उपाध्यक्ष डॉ. सी. यू. माने, क्रीडा संचालक, डॉ. दीपक डांगे-पाटील, प्रा. दिनेश रेवडे, नॅकचे समन्वयक प्रा. पी. वाय फडणीस, विजय काटे क्रीडा विभागाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे लक्ष्मी पवार यांनी प्रास्ताविक केले. तनुश्री कुंभार यांनी आभार मानले.