शहरं
Join us  
Trending Stories
1
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
2
जगातील सर्वात वृद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी निधन; महामार्गावर झाला होता अपघात
3
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, विवाहितेचे कापले केस; दीड वर्षाच्या चिमुकलीसह महिलेनं संपवलं आयुष्य
4
हे तर भयंकरच! मुंबई लोकल की, मृत्यूचे कारण?; 8 वर्षात 8 हजार 273 प्रवाशांचा मृत्यू
5
इराणची भीती संपेना! इस्राइलवर आता विश्वासच नाही; पुन्हा करतायत युद्धाची तयारी
6
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
7
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
8
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
9
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
10
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
11
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
12
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
13
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
14
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
15
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
16
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
17
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
18
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
19
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
20
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय

पक्ष्यांसाठी झाडांवरच केली चारा-पाण्याची व्यवस्था

By admin | Updated: April 16, 2015 00:04 IST

सर्पमित्र सरसावले : काशीळ येथे झाडांना टांगल्या प्लास्टिकच्या बाटल्या

काशीळ : उन्हाच्या झळा जशा माणसाला बसतात तशाच पशु-पक्ष्यांनाही बसत असतात. माणसानेच जंगलतोड अतिक्रमण करण्यास सुरुवात केल्यामुळे पशुपक्ष्यांचे जीवन धोक्यात आले आहे. चारा-पाण्याला महाग झालेले पशु-पक्षी म्हणून तर मानवी वस्तीत पोटासाठी येताना दिसतात. त्यांच्यासाठी काही करण्याची आता वेळ आली असून खारीचा वाटा म्हणून तीव्र उन्हाळा पक्ष्यांसाठी सुसह्य व्हावा, यासाठी त्यांना चारा-पाणी देण्याची एक वेगळी सोय काशीळ येथील सर्पमित्रांनी एकत्र येऊन केली आहे. उन्हाच्या वाढत्या तीव्रतेने आणि पिण्याच्या पाण्याच्या कमतरतेमुळे परिसरातील पक्ष्यांना भटकंती करावी लागू नये म्हणून काशीळ येथील सर्पमित्र सोहेल शेख आणि योगेश पवार, विशाल खावडीया, प्रफ्फुल माने, आशपाक फकीर या त्यांच्या सहकार्यांनी प्लास्टिकच्या टाकाऊ बाटल्या गोळ करून त्या झाडाला टांगल्या आहेत. त्यामध्ये पक्ष्यांसाठी चारा, पाण्याची व्यवस्था केली आहे. यामुळे पक्ष्यांची चांगली सोय झाली आहे. पक्ष्यांच्या प्रती आपली सामाजिक बांधिलकी जपत या मित्रांनी इतर तरूणांसमोर आदर्श निर्माण केला आहे. (वार्ताहर)सध्या सगळीकडे पाण्याच्या टंचाईमुळे नागरिकांबरोबरच पशु-पक्ष्यांनाही भटकंती करावी लागत आहे. तरूणांनी आपल्या परिसरातील झाडांवर पक्ष्यांसाठी चारा-पाण्याची सोय करायला पाहिजे.- सोहेल शेख, सर्पमित्र