शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

चक्का जाम!

By admin | Updated: January 31, 2017 23:52 IST

मराठा समाज रस्त्यावर : जिल्ह्यात तीसहून अधिक ठिकाणी आंदोलन

सातारा : ‘मराठा क्रांती मोर्चा’तून आपली ताकद दाखवून देणाऱ्या मराठा बांधवांनी मंगळवारी पुन्हा एकदा आपल्या एकीचे दर्शन घडविले. जिल्ह्यात तब्बल तीस ठिकाणी अत्यंत शांततेत अन् संयमाने ‘चक्का जाम’ आंदोलन यशस्वी झाले. या काळात पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गासह सारेच रस्ते पूर्णपणे ठप्प झाले होते.चक्का जाम आंदोलन सकाळी अकरा वाजल्यापासून करण्यात येणार होते; परंतु तरुण-तरुणी, महिला, ज्येष्ठ नागरिक सकाळी नऊ वाजल्यापासूनच घरातून बाहेर पडले होते. मिळेल त्या वाहनांनी ते नियोजित आंदोलनस्थळी जमा होत होते. पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शिरवळ, खंडाळा-पारगाव चौक, आणेवाडी टोल नाका, साताऱ्यातील वाढे फाटा, उंब्रजमध्ये तळबीड टोल नाका, कऱ्हाडला कोल्हापूर नाका येथे सुमारे तीन तास आंदोलन करण्यात आले. त्यामुळे शेकडो वाहनांची चाकं जाग्यावर थांबली होती. महामार्गाच्या इतिहासात बहुधा प्रथमच इतका जास्त काळ आंदोलन झाले; परंतु कोठेही गोंधळ पाहायला मिळाला नाही. तसेच दहिवडीत पिंगळी चौक, पुसेगावमध्ये शिवाजी चौक, कोरेगावात आझाद चौक, रहिमतपूर, फलटण, लोणंदमध्ये बसस्थानकासमोर, वाठार, मेढ्यातील-बाजार चौक, पाटणमधील जुने स्टँड, वाईतील बावधन नाका, म्हसवड, डिस्कळ- शिवाजी चौक, वडूजचा शिवाजी चौक, कातरखटावला कात्रेश्वर चौक, मायणी-चांदणी चौक, विखळे फाटा-शिवाजी चौक, पुसेसावळी-दत्त चौक, चौकीचा आंबा-प्रतापराव गुजर चौक येथे आंदोलन करण्यात आले. सर्वच ठिकाणी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. (प्रतिनिधी)रुग्णवाहिकेसाठीआंदोलनकर्ते पांगलेवाढे फाटा, उंब्रज येथे आंदोलन सुरू असताना अचानक एक रुग्णवाहिका तेथे आली. त्यावेळी आंदोलनकर्त्यांनी स्वयंशिस्तीने महामार्गावरून बाजूला होत गर्दीतून रुग्णवाहिकेसाठी स्वत:हून रस्ता काढून देण्यात आला. त्यानंतर रुग्णवाहिका मार्गस्थ झाली.