शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
2
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
4
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
5
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
6
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
7
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
8
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
9
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
10
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
11
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
12
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
13
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
14
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
15
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
16
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
17
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
18
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
19
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...

किमान तापमानात होतोय चढ-उतार

By admin | Updated: February 10, 2015 00:07 IST

साताऱ्यातील तापमान तर यंदा दहा अंशाच्या खाली आले होते. अनेक दिवस येथील नागरिकांना थंडीचा सामना करावा लागला.

सातारा : मागील काही दिवसांपासून किमान तापमानात मोठ्या प्रमाणात चढ-उतार होत आहे. मागील पंधरा दिवसांचे तापमान पाहिले तर काही दिवसांपूर्वी १६ अंशापर्यंत गेलेले किमान तापमान आता १०.०७ पर्यंत खाली आले आहे. यावर्षी सर्वात किमान तापमान हे ९ अंश नोंदले गेले होते. दरम्यान, कमाल तापमान हे स्थिर आहे. ३० ते ३१ अंशापर्यंत वर-खाली हे तापमान होत आहे. यामुळे नागरिकांना वेगळ्याच वातावरणाचा सामना करावा लागत आहे. परिणामी सर्दी, खोकल्याचे आजार बळावू लागले आहेत.जिल्ह्यात अडीच महिन्यांपासून थंडी जाणवत आहे. साताऱ्यातील तापमान तर यंदा दहा अंशाच्या खाली आले होते. अनेक दिवस येथील नागरिकांना थंडीचा सामना करावा लागला. यंदा किमान साडेआठ ते नऊ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान खाली उतरले होते. त्यानंतर २६ जानेवारीनंतर थंडी कमी झाली; पण दोनच दिवस कमी थंडीचे वातावरण राहिले. त्यानंतर थंडी वाढली तसेच कमाल तापमानातही फरक पडत गेला. किमान तापमान कधी १६ अंशापर्यंत गेले, तर परत १४ अंशापर्यंत खाली उतरले, अशी स्थिती राहिली. मागील दोन दिवसांत तर किमान तापमान हे १२ अंशाच्या खाली आले आहे. गेल्या पंधरा दिवसांत सर्वात कमी तापमानाची नोंद रविवारी झाली. त्यादिवशी किमान तापमान १०.०७ पर्यंत खाली आले होते. तर. सोमवारी सकाळी (दि. ९) ११.०२ तापमानाची नोंद झाली. कमाल तापमानातही चढ-उतार होत राहिला आहे. पण, त्यामध्ये फारसा फरक पडलेला नाही. मागील काही दिवसांपासून २९ ते ३१ अंशादरम्यान साताऱ्यातील कमाल तापमान राहिले आहे. मात्र, सोमवारी सकाळी मागील दोन महिन्यांतील कमाल तापमानात वाढ झाल्याचे काहीसे दिसून आले. (प्रतिनिधी)सातारचे तापमान किमान कमालदि. ५ १२.०४ ३०.०३दि. ६ १४.०० ३०.००दि. ७ १२.०२ ३१.०६दि. ८ १०.०७ ३०.०६दि. ९ ११.०२ ३१.०८