शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
3
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
4
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
5
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
6
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
7
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
8
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
9
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
10
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
11
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
12
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
13
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
14
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
15
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
16
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
17
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
18
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
19
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
20
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...

पुसेगावच्या यात्रेला फ्लेक्स मुक्तीचे वेध..

By admin | Updated: December 21, 2016 23:47 IST

बैठकीत सकारात्मक चर्चा :

परवानगी शिवाय फ्लेक्स लावल्यास कडक कारवाई; ग्रामपंचायतीचा इशारापुसेगाव : सेवागिरी महाराजांची वार्षिक यात्रा व नवीन वर्षाचे स्वागत तसेच आगामी निवडणुकांचे औचित्य साधून यंदाच्या पुसेगाव यात्रेत फ्लेक्सयुद्ध चांगलेच रंगण्याची शक्यता होती. मात्र, बुधवार, दि. २१ रोजी यात्रेच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत देवस्थान ट्रस्ट व पुसेगाव ग्रामपंचायत व्यतिरिक्त कोणीही फ्लेक्स लावायचा नाही, तसेच वर्षभर ग्रामपंचायत, पुसेगाव पोलिस ठाणे व संबंधित जागेचा मालक यांच्या परवानगी शिवाय फ्लेक्स लावणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थांवर कडक कारवाई करण्याचा एकमुखी निर्णय बैठकीत घेण्यात आला. या बैठकीस सरपंच दीपाली मुळे, उपसरपंच व ट्रस्टचे विश्वस्त रणधीर जाधव यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य प्रकाश जाधव, सत्यम जाधव, वैभव भोसले, अनिल बोडके, सुरेखा जाधव, सीमा जाधव, हेमा गोरे, मनीषा पाटोळे ग्रामविकास अधिकारी एन. एम. नाळे आदी उपस्थित होते.श्री सेवागिरी महाराजांची वार्षिक यात्रा दि. २३ डिसेंबर ते २ जानेवारी या कालावधीत होणार आहे. बुधवार, दि. २८ रोजी या यात्रेचा मुख्य दिवस असून, या दिवशी रथसोहळा होणार आहे. दहा दिवस चालणाऱ्या या यात्रेत महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटक व गुजरात राज्यांतील लाखो भाविक हजेरी लावतात. तसेच खरसुंडी, आटपाडी येथे भरणाऱ्या जनावरांच्या बाजारापेक्षाही मोठा बैल बाजार पुसेगावात भरतो. यावर्षी सेवागिरी देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने राज्यस्तरीय कृषी व पशुपक्षी प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. याशिवाय राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा, कबड्डी स्पर्धा, जिल्हास्तरीय युवा महोत्सव, शरीर सौष्ठव स्पर्धा, वान शर्यती अशा स्पर्धांचे आयोजनही यात्रा कालावधीत करण्यात आले आहे. दरम्यान, श्री सेवागिरी महाराजांच्या यात्रेचे निमित्त पुढे करत विविध राजकीय पक्ष व संस्था यात्रेच्या व नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी भले मोठे फ्लेक्स पुसेगावातील चौकासह सर्वच रस्त्यांवर व जागा मिळेल तेथे लावतात. यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. गावातील बऱ्याच दुकानदारांनी व व्यावसायिकांनी फ्लेक्समुळे निर्माण होणाऱ्या अडचणी मांडून दुकानासमोर फ्लेक्स लावण्यास परवानगी देऊ नये, अशा तक्रारींचा अर्ज पुसेगाव ग्रामपंचायतीकडे दिला होता. या अर्जाचा ग्रामपंचायतीने गांभीर्याने विचार करून बुधवारी झालेल्या बैठकीत कोणाच्याही परवानगी शिवाय फ्लेक्स न लावण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. या ठरावामुळे पुसेगावची यात्रा फ्लेक्स मुक्त होणार असून, समाजातील सर्वच स्तरांतील नागरिकांनी व दुकानदारांनी या निर्णयाचे कौतुक केले आहे. (वार्ताहर)