शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

फ्लेक्सवर झळकताय? जरा जपून!

By admin | Updated: March 1, 2016 00:10 IST

फलकांवर दिसताच गायले जायचे गोडवे; आता दिसताक्षणी पोलिसांना कळविणे

सातारा : पोलिसांना डोकेदुखी ठरलेले अनेक ‘बाबूराव’ आता हद्दपार झाले आहेत. काही दिवसांपूर्वी ज्यांच्या वाढदिवसाचे फलक शहरभर थाटात उभे राहत होते, तेच पोलिसांचा झटका बसल्याने हद्दीबाहेर काढण्यात आले आहेत.शहर परिसरात ज्यांचे फलक थाटात उभे राहत होते. पालिकेची कधी परवानगी तर कधी दंडेलशाही पद्धतीने हे फलक झळकवले जात. नेत्यांचा वाढदिवस असो, कुठली नवी नियुक्ती असो. तडीपारांपैकी अनेक बहाद्दर बुके हातात घेऊन शहरातील फलकांवर हजर! नेत्यांचा वरदहस्त असल्याचे भासवून पोलिसांपुढे मिजास मारणाऱ्यांना पोलिसांनी चांगलीच पेकाटात मारलेली पाहायला मिळत आहे. शांत साताऱ्यात आतून धगधगणारी अस्वस्थता या तडीपारीच्या निर्णयाने बाहेर पडली आहे. पोलिसांनी १५ जणांना तडीपार केलेआहे. यापैकी काहीजण सातारा, कोरेगाव, जावळी तालुक्यांतून, काहीजण सातारा जिल्ह्यातून तर काहीजण पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांतून तडीपार केले गेले आहेत. पोलीस एवढ्यावरच थांबलेले नाहीत. शहरामध्ये नगरपालिका, शहर पोलीस ठाणे, तालुका पोलीस ठाणे, शिवाजी संग्रहालय या परिसरात या तडीपार मंडळींचे फोटोसह तडीपारीच्या तारखेची माहिती देणारे फलक झळकले आहेत. यापैकी कोणीही हद्दपार केलेल्या ठिकाणावर आढळल्यास त्याची माहिती पोलिसांना कळविण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी यापेक्षा वेगळी परिस्थिती होती. शहरभर अनेकजण नेत्यांच्या वाढदिवसांचे, नवीन नियुक्तीचे औचित्य साधून फलक उभारत होते. त्यावर तडीपारांपैकी अनेकांचे फोटो झळकत. तेव्हा लोक मुजरे करत होते. (प्रतिनिधी)लपून-छपून... तडीपारीची नोटीस निघाल्याने तडीपार केलेल्या तारखेपर्यंत या मंडळींना हद्दीबाहेर राहावे लागणार आहे. तरीही लपून-छपून त्यांचा ‘उद्योग’ सुरू राहू शकतो, हे ओळखून पोलिसांनी त्यांचे फोटो फलकांवर झळवले आहेत.